शेफ नीलेश लिमये nilesh@chefneel.com

हे एकदम सोप्पे सॅलड आहे. संध्याकाळचे जेवण न घेताही तुम्ही हे सॅलड खाऊ शकता. वाफवून परतल्याने त्याची चव आणखी छान होते, शिवाय तिळाच्या तेलाचा स्वादही खरपूस चव देतो. ग्रीन टी आणि हे सॅलड एकदम छान कॉम्बो आहे.

साहित्य

* १०० ग्रॅम फरसबी

* ४ इंच आले

* १ चमचा सोया सॉस

* २ चमचे तिळाचे तेल

* चवीसाठी मीठ-मिरपूड

*  बदामाचे काप सजावटीकरता.

कृती

फरसबी धुऊन तिची साले काढून घ्या. उकळत्या पाण्यात मोजून ५० सेकंद ठेवा. त्यानंतर लगेचच थंडगार पाण्यात टाका. म्हणजे ती लेमळी होणार नाही. हिरवा रंग आणि करकरीतपणा टिकून राहील. एका पातेल्यात १ चमचा तिळाचे तेल टाका. ते गरम झाल्यावर त्यात आल्याचे काप परतून घ्या. उकडलेली फरसबी घाला. सोया सॉस आणि मीठ-मिरपूड घालून ते मिश्रण एकत्र करा. गॅसच्या मोठय़ा आचेवर दोन मिनिटे ते परता, अवसडून घ्या. फरसबीला छान खरपूस सुगंध येतो. खाताना वर सजावटीसाठी बदामाचे काप पेरा. हे सॅलड गरमागरम किंवा थंडगार दोन्ही पद्धतीने खाता येईल. शिवाय यात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्सही भरपूर आहेत.