19 October 2019

News Flash

योगस्नेह : हस्त उत्थानासन

हस्त उत्थानासन हा सूर्यनमस्कारातीलच एक टप्पा आहे.

उत्तम आरोग्यासाठी दररोज सकाळी सूर्यनमस्कार घालणे आवश्यक आहे. हस्त उत्थानासन हा सूर्यनमस्कारातीलच एक टप्पा आहे. या आसनामुळे पाठीचा कणा व पोटावरील त्वचा ताणली जाते. त्यामुळे तेथील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनात दीर्घश्वसनाची आवर्तने केल्यास श्वसनक्षमता सुधारते.

कसे करावे?

* हे आसन करताना दंडस्थितीत दोन्ही पायांत अंतर ठेवून उभे राहा.

* आता सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर उचला.

* दोन्ही हात एकमेकांना समांतर राहू द्या.

* दोन्ही हातांमध्ये दोन खांद्यांइतकेच अंतर ठेवा.

* हात वर उचलल्यावर शरीर आपल्या क्षमतेनुसार थोडेसे मागे झुकवा. आता मान वरच्या दिशेला वळवा.

First Published on April 16, 2019 3:12 am

Web Title: hasta uttanasana