News Flash

घरचा आयुर्वेद : डोकेदुखी

आहारातील घटक : बटाटा, पिठले, ब्रेड इत्यादी वातूळ पदार्थाच्या सेवनाने डोके दुखू लागते.

घरचा आयुर्वेद : डोकेदुखी
(संग्रहित छायाचित्र)

वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

ayurvijay7@gmail.com

डोकेदुखी हा विषय समजून घेणे आपल्या सर्वाच्याच दृष्टीने महत्त्वाचे आहे.  डोकेदुखीची मूळ कारणे दूर केल्याशिवाय ही तक्रार बंद होऊ  शकत नाही. डोकेदुखीची मूळ कारणे आयुर्वेदीय दृष्टिकोनातून समजून घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदाने वात, पित्त, कफ हे तीन घटक शरीरामध्ये व्याधी उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात, असे मानले आहे. डोकेदुखीही याला अपवाद नाही. या वरील तीन घटकांपैकी ज्या घटकात असमतोल निर्माण झाला असेल किंवा ज्या घटकाचा प्रकोप झाला असेल त्यानुसार डोकेदुखीचे स्वरूपही भिन्न असते.

मलावरोध : मलावरोधाची नेहमीच तक्रार असल्यास त्यामुळे डोकेदुखीची तक्रार उद्भवू शकते. शौचाला साफ होणारे औषध दिल्यावर डोकेदुखी थांबते.

गॅस : पोटात गॅस होणे, गुबारा धरणे यामुळेही डोके दुखू शकते. ते कारण दूर केल्यावर डोके दुखणे थांबते.

आहारातील घटक : बटाटा, पिठले, ब्रेड इत्यादी वातूळ पदार्थाच्या सेवनाने डोके दुखू लागते. वरील सर्व कारणांनी प्रामुख्याने वातदोषाचा प्रकोप होतो आणि डोके ठणकते. या प्रकारच्या डोकेदुखीत अनेकदा डोके बांधून ठेवल्यास बरे वाटते. वेदना बऱ्याच तीव्र स्वरूपाच्या असतात. यामध्ये नुसती डोकेदुखीची गोळी घेऊन आराम पडत नाही. त्याचे कारण शोधून त्यावर उपचार केल्यावर मगच बरे वाटते.

सर्दी पडसे : सर्दी पडशामुळे डोके दुखणे या प्रकारचा अनुभव अनेकांना असेल. कफदोषाच्या प्रकोपामुळे नाक गच्च होते. डोके जड पडल्यासारखे वाटते आणि मंद डोकेदुखी असते. सतत डोक्यावरून गार पाण्याची अंघोळ करणाऱ्यांना अशा प्रकारची डोकेदुखी उद्भवू शकते.

थंड वातावरण : थंड वातावरणाचा संपर्क हेही या प्रकारच्या डोकेदुखीचे कारण असते. सतत वातानुकूलिन खोलीत बसून काम करणे, पंख्याखाली झोपण्याची सवय असणे, उघडय़ा वाहनावरून प्रवास करणे हे डोकेदुखीस कारणीभूत ठरतात.

उपचार :

*  आयुर्वेदाने सर्व प्रकारच्या डोकेदुखीवर उपचार सांगितलेले आहेत. वर वर्णन केल्याप्रमाणे नेमक्या कोणत्या घटकाचा (वात, पित्त, कफ यापैकी) यामध्ये संबंध आहे, हे पाहून मग त्या दोषावरील उपचार केले जातात. त्याप्रमाणे या उपचार पद्धतीत डोकेदुखी नेमकी कशामुळे होत आहे, हे शोधून मग त्या मूळ रोगावर औषधी योजना केली जाते व डोकेदुखीची तक्रार सोडवली जाते.

*  नाकात कफ जास्त साचल्याने होणाऱ्या डोकेदुखीवर सुंठ व वेखंड यांचा लेप अनेकदा उपयोगी पडतो. सुंठ चूर्ण आणि मध यांचे मिश्रणही कफाच्या डोकेदुखीत उपयोगी पडते. सुतशेखराची मात्राही पित्तामुळे होणाऱ्या डोकेदुखीत उपयोगी पडते. गोदन्ती भस्म, लघुसुत, शेखर अशीही काही औषधे डोकेदुखीत वैद्यकीय सल्लय़ाने घेता येतात. अशा प्रकारे अनेक उपाय योजता येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 3:57 am

Web Title: headache treatment in ayurveda
Next Stories
1 आरोग्यदायी आहार : व्हेगन स्मुदी
2 नव्या दमाची
3 मस्त मॉकटेल : रोझमेरी ब्लूबेरी स्मॅश
Just Now!
X