09 December 2019

News Flash

योगस्नेह : अर्धचक्रासन

हे आसन केल्याने पाठीचा कणा लवचिक होतो आणि कण्याला जोडलेले मज्जातंतू बळकट होतात.

अर्ध्या चक्रापणे दिसणारे हे आसन केल्याने पाठीचा कणा लवचिक होतो आणि कण्याला जोडलेले मज्जातंतू बळकट होतात. मान अधिक मजबूत होते आणि श्वसनक्रिया सुधारते.

कसे करावे?

* पाठीला हातांनी कमरेजवळ आधार द्या. हाताची सर्व बोटे जमिनीच्या दिशेने वळलेली असावीत.

* डोके मागे न्या. मानेचे स्नायू ताणले जातील.

* मागे झुकताना श्वास सावकाश आत घ्या. पूर्ण झुकल्यानंतर श्वास सोडा.

* अशाच स्थितीत १०-३० मिनिटे राहा. श्वासोच्छ्वास सुरूच ठेवा.

* उच्छ्वास सोडत हळूहळू पुन्हा सरळ उभे राहा.

First Published on April 30, 2019 1:55 am

Web Title: health benefits of ardh chakrasana yoga
Just Now!
X