News Flash

योगस्नेह : वज्रासन

या आसनाच्या सरावामुळे जननेंद्रिय व ओटीपोटावर लाभदायक परिणाम होतो.

वज्र म्हणजे इंद्राचे अस्त्र. या आसनामध्ये पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते म्हणून त्याला वज्रासन म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे जननेंद्रिय व ओटीपोटावर लाभदायक परिणाम होतो. हे ध्यानासाठी योग्य आसन असून त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते.

कसे करावे?

* दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून पाय पसरून बसावे. हात नितंबाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवावेत.

* डाव्या हातावर शरीराचा भार घेऊन उजव्या हाताच्या मदतीने उजवा पाय गुडघ्यात दुमडावा.

* उजव्या पायाचा तळवा आकाशाच्या दिशेने ठेवून पाऊल मागे न्यावे. अशा प्रकारे उजव्या नितंबाखाली उजवे पाऊल व्यवस्थित ठेवावे.

* आता शरीराचा भार उजव्या हातावर व बाजूवर घेऊन वरीलप्रमाणे कृती करून डाव्या पायाचे पाऊल डाव्या नितंबाखाली स्थिर करावे. या स्थितीमध्ये दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना लागतील याची काळजी घ्यावी.

* ओटीपोटाचा भाग थोडा पुढे करावा. पाठीचा कणा ताठ ठेवावा. हातांचे तळवे गुडघ्यांवर किंवा गुडघ्यांजवळ मांडीवर ठेवावेत. पोट व हाताचे स्नायू ढिले सोडावेत.

* डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटाव्यात. लक्ष श्वासावर केंद्रित करावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 3:44 am

Web Title: health benefits of vajrasana yoga zws 70
Next Stories
1 आरोग्यदायी आहार : ओल्या हळदीचे लोणचे
2 ‘बीएस ६’ ला पसंती
3 ओकिनावाची विजेवर चालणारी ‘लाइट’
Just Now!
X