देशाची पहिली १०० सीसी बीएस ६ मोटारसायकल हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वात मोठय़ा दुचाकी उत्पादक कंपनीने आपली पहिली बीएस ६ मोटारसायकल ‘एचएफ डीलक्स’ बाजारात सादर केली. जानेवारी २०२०च्या सुरुवातीपासून सेल्फ स्टार्ट अलॉय व्हीलसाठी ५५,९२५ रुपये आणि सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील आय३एस साठी ५७,२५० रुपये (दोन्ही किमती एक्स-शोरूम दिल्ली) इतक्या आकर्षक किमतींमध्ये ती उपलब्ध असेल.

ही मोटारसायकल १०० सीसी बीएस-६ प्रमाणित प्रोग्राम फ्युएल इंजेक्शन इंजिनसह ‘एक्ससेन्स टेक्नोलॉजी’ (१० सेन्सर्स) येते. हे इंजिन ८००० आरपीएममध्ये ७.९४ बीएचपीचे प्रभावी पॉवर आऊटपूट आणि ६००० आरपीएममध्ये ८.०५ एनएम टॉर्क देते. ९ टक्के अधिक इंधन कार्यक्षमतेसह उत्तम कामगिरी, सुसंगत स्टार्ट-क्षमता (थंड वातावरणांमध्ये देखील) आणि दीर्घकाळ टिकणारे इंजिन अशी सर्वोत्तम वैशिष्टय़े या गाडीत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

प्रोग्राम एफआय सिस्टीम विविध भार स्थितींमध्ये अचूक एअर-फ्युएल मिश्रण वितरणाची खात्री देते. ज्यामधून सुलभ राइड क्षमता मिळते. तसेच ही सिस्टीम तीक्ष्ण थ्रोटल प्रतिसादासाठी इंजिन भार व आसपासच्या स्थितींच्या आधारावर सातत्याने व रिअल-टाइम हवा व इंधनाच्या मिश्रणाच्या समायोजनाची (सेन्सर्स व ईसीयूच्या माध्यमातून) खात्री देते. सिस्टीम अधिक कार्यक्षम कंबशनची खात्री देते, ज्यामधून उच्च इंधन कार्यक्षमता व नियंत्रणपूर्ण उत्सर्जन मिळते. ही सिस्टीम सामान्यत: मेन्टेनन्स-मुक्त आहे आणि यामध्ये सहजपणे बिघाड होत नाही. १६५ मिमी ग्राऊंड क्लिअरन्स आणि १२३५ मिमी व्हीलबेससह ही दुचाकी अधिक स्थिरतेसह उच्च दर्जाचा राइड अनुभव देते.

ही मोटारसायकल ब्लॅक व रेड, ब्लॅक व पर्पल, ब्लॅक व ग्रे अशा आकर्षक रंगांमध्ये आणि ग्रीन व टेक्नो ब्ल्यू आणि हेवी ग्रे अशा दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

किंमत ५५,९२५/- रुपये