टेस्टी टिफिन : शुभा प्रभू साटम
साहित्य
- १ वाटी कणीक
- खायचा सोडा
- वेलची जायफळ पूड
- गूळ
- तेल
- पाणी
कृती
खायचा सोडा अगदी किंचित घालून वाटीभर कणीक घट्टसर भिजवून घ्यावी. एक वाटी गूळ पाण्यात विरघळवून गॅसवर थोडासा घट्ट शिजवून घ्यावा. साधारण एकतारी पाक व्हायला हवा. पिठाचे चपट गोळे करून त्याला थोडेसे टोचे मारून ते तेलात लालसर तळून घ्यावेत आणि गुळाच्या पाकात टाकावेत.
पाक करायचा नसेल तर मग साखर आणि दालचिनी वापरू शकता. या दोन्हींची एकत्रित पूड करून घ्यावी. पहिल्याप्रमाणेच कणीक भिजवून त्या पिठाचे चपट गोळे आणि तेलातून तळून घ्यावेत आणि त्यावर साखर-दालचिनी पूड भुरभुरावी.
ही घरगुती बिस्किटं फार चवदार लागतात. यामध्ये कणकेऐवजी ज्वारी-बाजरीचे पीठ किंवा एकत्रित पिठेही वापरू शकता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 5:08 am