UPSC Civil Services Result 2023 Marathi News
UPSC Result 2023: नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर; असा पाहा ऑनलाइन निकाल
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

बाल्कनी, गॅलरी किंवा खिडकीच्या ग्रिलमध्ये लावता येईल असे सुगंधी आणि तेवढेच सुंदर फूल म्हणजे निशिगंध. निशिगंधाचे विविध प्रकार कुंडीत वाढवता येतात.

निशिगंध (टय़ूबरोज) व भुईचाफा ही सुगंधी फुले येणारे कंद लावून आपण बागेची शोभा वाढवू शकतो. निशिगंध/ रजनीगंधाचे तीन प्रकार आहेत. एकेरी, दुहेरी व व्हेरिगेटा (पाने पिवळी व हिरवी). एकेरी निशिगंधाला जास्त काळ सुगंध येतो तर दुहेरी जास्त काळ टिकते. साधारण २०-२५ ग्रॅमचे कंद लावतात. कंदाच्या आकाराएवढाच तो खोल लावावा. उभा दांडा येतो व त्यावर खूप कळ्या येतात आणि खालून वर उमलत जातात. थंडीत जास्त दांडे येतात. दांडे येऊन गेल्यावर पाणी काही काळ बंद करावे किंवा कंद खोदून बाहेर काढावा; त्यावर अनेक पिल्ले आलेली असतात, ती वेगळी करावीत. मुख्य कंद सावलीत हवेशीर जागी ठेवावा व २०-२५ दिवसांनी परत लावावा. कंद वेगळे न केल्यास पिल्ले वाढतात व फुलांचे प्रमाण कमी होते.

सुगंधी फुलांचे वेल खूप आहेत.. मदनबाण, जाई, जुई, सायली इत्यादी. ते चांगले वाढतात आणि त्यांची छाटकलमेही होतात. थोडी मोठी कुंडी घेऊन त्यात वेल लावले तर अनेक वर्षे चांगले वाढतात. यात एक अजून आटोपशीर सुगंधी फुलांची वेल आहे, ती म्हणजे रानजाई. या वेलीवर उमलणाऱ्या फुलांना छान सुगंध असतो. वेलीची छाटणी करून ती आटोपशीर ठेवता येते. वेलीवर छान नाजूक व सुगंधी फुलांचे घोस लगडतात.

टीप – घरात स्वयंपाक करताना तांदूळ, डाळ, कडधान्ये भाज्या, मासे, मटण, इ. धुताना वापरलेले पाणी आपण खत म्हणून सर्व झाडांना घालू शकतो.