News Flash

सेल्फ सव्‍‌र्हिस : मिक्सरची निगा

मिक्सरमध्ये वाटण्यासाठी टाकलेले पदार्थ बाहेरील तापमानाशी सुसंगत असावेत

मिक्सर हे आपल्या स्वयंपाकघरातील बहुपयोगी आणि अत्यावश्यक उपकरण आहे. मसाला तयार करणे, शेंगदाणे-खोबरे यांचा कूट, विविध पदार्थ बारीक करणे, पेस्ट तयार करणे आदींसाठी मिक्सरचा उपयोग होतो. मात्र या महत्त्वाच्या उपकरणाची योग्य निगा राखली नाही तर ते लवकर खराब होते. मिक्सरची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या टिप्स..

मिक्सरचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी त्याचे भांडे साफ करणे आवश्यक आहे. भांडे साफ करण्यापूर्वी आतमधील पाती बाहेर काढून ठेवावीत, जेणे करून हाताला इजा होणार नाही आणि भांडे योग्य पद्धतीने साफ होईल. पाणी टाकून हे भांडे निसळून घ्या आणि त्यानंतर स्वच्छ कपडय़ाने आतील भाग पुसून घ्या. त्यामुळे त्या भांडय़ाला येत असलेला वास नष्ट होईल. वापर करताना भांडे मिक्सरवर घट्ट बसवणे आवश्यक आहे. भांडे योग्य पद्धतीने बंद झाले पाहिजे. नाहीतर आतील पाती खराब होण्याची शक्यता असते.

मिक्सर चालवताना थेट उच्च वेगावर चालवू नका. सुरुवातीला सर्वात कमी वेगावर चालवून हळूहळू हा वेग वाढवा. थेट ‘हाय’ अर्थात उच्च वेगक्षमतेवर मिक्सर चालवल्यास आतील मोटार नादुरुस्त होण्याची शक्यता असते.

मिक्सरमध्ये वाटण्यासाठी टाकलेले पदार्थ बाहेरील तापमानाशी सुसंगत असावेत. अतिशय गरम पदार्थ टाकल्यास मिक्सरचे भांडे वा पाती खराब होऊ शकतात.

मिक्सरची वायर नियमितपणे ओल्या कपडय़ाने पुसत जा. त्यामुळे तिच्यावरील तेलकटपणा वा आद्र्रता निघून जाते.

मिक्सरचे भांडे साफ कसे करावे?

  • मिक्सरचे भांडे साफ करण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर करावा. लिंबू कापल्यानंतर त्यातील संपूर्ण रस काढून घ्या आणि नंतर उरलेल्या सालाने भांडे आतून आणि बाहेरून घासावे. यामुळे भांडय़ाला येत असलेल्या उग्र वास आणि तेलकटपणा नष्ट होईल. घासून झाल्यानंतर १५ मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने भांडे धुवावे.
  • मिक्सरचे भांडे धुण्यासाठी बेकिंग पावडरचा वापर करावा. बेकिंग पावडरमध्ये थोडे पाणी ओतून पेस्ट तयार करा. ही पेस्ट भांडय़ाला आतून-बाहेरून लावावी. १५ मिनिटांनंतर भांडे धुऊन घ्यावे.
  • दोन टेबलस्पून व्हेनेगरमध्ये थोडे पाणी मिसळून हे मिश्रण भांडय़ावर लावावे आणि धुऊन घ्यावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2018 1:23 am

Web Title: how to care mixer mixer grinder
Next Stories
1 पतंग ‘गुल’
2 हसत खेळत : सिट अप्स्/ अ‍ॅब्डॉमिनल क्रंच
3 फेकन्युज : मोदींच्या नावे फुकटात ‘टॅब’..
Just Now!
X