24 September 2020

News Flash

योगस्नेह : भस्रिका प्राणायाम

अपचन, गॅस यांसह विविध पोटविकारांसाठी हा प्राणायाम महत्त्वाचा आहे.

भस्रिका प्राणायामात श्वास नाकावाटे आत घेऊन जलद गतीने बाहेर सोडला जातो. या प्रकारामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते. नाक, घसा, सायनसमधील अडथळे दूर होतात. अपचन, गॅस यांसह विविध पोटविकारांसाठी हा प्राणायाम महत्त्वाचा आहे.

कसे करावे?

* प्रथम पद्मासनात बसा. मान व शरीर ताठ ठेवून तोंड बंद करावे.

*  जलदगतीने श्वास आत-बाहेर करावा.

*  असे करताना नाकातून भुसभुस असा आवाज येतो.

* श्वास आत-बाहेर करताना त्याला योग्य गती द्या.

* आधी १० वेळा करून पाहावे आणि हळूहळू प्रमाण वाढवावे.

* श्वसन आत-बाहेर करून झाल्यावर थोडा वेळ शांत बसा आणि ध्यानस्थ व्हा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 2:47 am

Web Title: how to do bhastrika pranayama yoga zws 70
Next Stories
1 आरोग्यदायी आहार : तिळगूळ पोळी
2 ‘ई कॉल’चे सुरक्षाकवच
3 सुवर्ण सवारी
Just Now!
X