13 July 2020

News Flash

योगस्नेह : हस्तपादासन

सूर्यनमस्कार करताना जी आसने केली जातात, त्यापैकी हे एक आसन आहे.

कसे करावे?

सूर्यनमस्कार करताना जी आसने केली जातात, त्यापैकी हे एक आसन आहे. पाठ आणि पोट यांचे स्नायू मजबूत होण्यास या आसनाचा उपयोग होतो. या आसनाने पाठीचे सर्व स्नायू ताणले जातात. पाठीचा कणा मजबूत होतो.

* ताठ उभे राहा. दोन्ही हात सरळ रेषेत वर करा.

* आता श्वास घेत पुढे झुका. श्वास सोडत कंबरेमध्ये वाकून हात पायाच्या दिशेने न्या.

* दीर्घ श्वास घेऊन २० ते ३० सेकंद या स्थितीत थांबा.

* पाय आणि मणका ताठ राहू द्या. हात पावलांवर किंवा पायांशेजारी जमिनीवर टेकवा.

* श्वास सोडत छाती गुडघ्याकडे नेऊ या. नितंब वर उचलू या. डोके पायांजवळ सैल सोडावे.

* श्वास घेत हात वर करून हळूहळू उभे राहा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2019 2:58 am

Web Title: how to do hastapadasana yoga benefits
Next Stories
1 आरोग्यदायी आहार : पावभाजी खाकरा
2 गाडीच्या देखभालीबाबतचे गैरसमज
3 व्हिंटेज वॉर : फेरारी विरुद्ध मॅकलेरन
Just Now!
X