आधुनिक आणि ‘स्मार्ट’ युगात आता बहुतेकांच्या मनगटावर स्मार्टवॉच असते. सामान्य घडय़ाळ आणि स्मार्टवॉच यामध्ये फरक असून हा फरक लक्षात घेऊनच स्मार्टवॉचची देखभाल करा.

*      स्मार्टवॉच आणि सामान्य घडय़ाळाची स्क्रीन यामध्ये फरक आहे. सामान्य घडय़ाळाच्या स्क्रीनचे आवरण काचेचे किंवा प्लास्टिकचे असते. टी-शर्ट किंवा मळक्या कापडाने हे घडय़ाळ पुसण्याची बहुतेकांना सवय असते मात्र स्मार्टवॉचला टचस्क्रीन असते, त्यामुळे कोणत्याही कापडाने ती साफ करू नका.

*  ओल्या कापडाने कधीही स्मार्टवॉचची स्क्रीन साफ करू नका. शक्यतो स्मार्टवॉचची स्क्रीन साफ करताना स्मार्टवॉच ‘पॉवर ऑफ’ करा.

*  स्मार्टवॉच साफ करताना मायक्रोफायबर क्लोथचा वापर करा. टिश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करू नका. टिश्यू पेपरचे लहान कन साफ करताना स्क्रीनवर राहतात. पेपर टॉवेलमुळे स्क्रीनवर ओरखडे पडण्याची शक्यता असते.

*      रासायनिक पदार्थ किंवा घरगुती साफसफाईसाठी वापरण्यात येणारी रसायने यांचा वापर स्मार्टवॉच पुसताना करू नका.

*  स्मार्टवॉच पाणी किंवा अपायकारक रसायनांपासून दूर ठेवा. काही स्मार्टवॉच जलरोधक (वॉटरप्रूफ) असतात. मात्र डिर्टजट किंवा साबणामुळे ती खराब होण्याची शक्यता असते.

*      स्मार्टवॉचचा पट्टा साफ करताना तो कोणत्या प्रकारचा आहे, हे लक्षात घ्या. तो जर रबरी किंवा प्लास्टिकचा असेल, तर ओल्या कपडय़ाने साफ करू शकता. पण ओला कपडा टचस्क्रीनला लागणार नाही याची काळजी घ्या.

* स्मार्टवॉचचा पट्टा तुटला असेल किंवा तो खराब झाला असेल तर तो तात्काळ बदलून घ्या.