14 December 2019

News Flash

दोन दिवस भटकंतीचे : कोल्हापूर

राज्य शासनाने मान्यता दिलेले छत्रपती शिवरायांचे अस्सल चित्र इथेच आहे.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

शनिवार

दक्षिणकाशी म्हणून गौरवलेल्या रांगडय़ा कोल्हापूरला जावे. खासबागेतली मिसळ खावी आणि कैलासगडची स्वारी या शिवालयाला भेट द्यवी. दीड टनाच्या आणि २२ फूट उंच दोन समया आहेत. थोर चित्रकार जी. कांबळे यांनी काढलेली तैलचित्रे इथे आहेत. राज्य शासनाने मान्यता दिलेले छत्रपती शिवरायांचे अस्सल चित्र इथेच आहे. मिरजकर तिकटी येथील प्रवासी विठ्ठल मंदिराला भेट द्यवी. इथे विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामेच्या पायात कोल्हापुरी चपला आहेत. राजारामपुरीत निसर्ग बंगल्यामध्ये थोर अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांढरे यांचे कलादालन आहे.

रविवार

गगनबावडय़ाच्या दिशेला जावे. आसळज गावाजवळून डावीकडे ४ कि. मी.वर असलेल्या पळसंबे इथे जावे. ओढय़ाच्या प्रवाहात एकाच दगडातून कोरून काढलेली म्हणजेच एकाश्म मंदिरे आहेत. रामलिंगेश्वर मंदिरे म्हणूनही ओळखली जातात. तीन एकाश्म मंदिरे आहेत. शेजारीच खडकात खोदून काढलेला गणपती दिसतो. तिथून पुढे गगनबावडा या घाटमाथ्यावर असलेल्या सुंदर गावी जावे. इथे डोंगरवर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तिथून घाटरस्ता आणि कोकणचा परिसर सुंदर दिसतो. गगनबावडा एसटी स्थानकाच्या कॅन्टीनमध्ये मिळणारा ‘कट वडा’ न चुकता खावा. अशी चव इतरत्र मिळत नाही.

First Published on December 21, 2018 2:09 am

Web Title: incredible places to visit in kolhapur kolhapur tourist attractions
Just Now!
X