25 January 2020

News Flash

ऑफ द फिल्ड : विंडिज दौऱ्यावरील अवांतर क्षण

कसोटी मालिकेलाच सुरुवात होण्यापूर्वी सर्व भारतीय खेळाडूंची अँटिग्वा येथील जॉली बीचवर सहल गेली होती

(संग्रहित छायाचित्र)

ऋषिकेश बामणे

भारताचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच पार पडला. या दौरम्य़ात भारताने ट्वेन्टी-२०, कसोटी व एकदिवसीय मालिकेतही यश संपादन केले. परंतु मैदानावरील बाबींबरोबरच मैदानाबाहेरील गोष्टींसाठीही हा दौरा गाजला. अशाच काही घटनांचा घेतलेला हा आढावा.

अनुष्काचा वायरल फोटो

कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने ट्वीटरवर पोस्ट केलेला ‘बिकिनी’तील छायाचित्र फारच गाजले. यावर अनेकांनी अनुष्काला ट्रोलही केले. काहींनी तिच्या भगव्या रंगाच्या वस्त्राची ‘व्हीएलसी मिडीया प्लेअर’शी तुलना केली, तर काहींनी महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती ठाऊक असूनही तिला असे मजेशीर पोस्ट केले म्हणून खडसावले. त्याचप्रमाणे तिचे सुई धागा चित्रपटातील मीम्स या छायाचित्राशी जोडून जेव्हा ती तुमची प्रेयसी असते व जेव्हा ती तुम्हाला सोडून जाते, अशा प्रकारच्या गमतीदार प्रतिक्रिया लिहिल्या.

खेळाडूंची मौजमजा

कसोटी मालिकेलाच सुरुवात होण्यापूर्वी सर्व भारतीय खेळाडूंची अँटिग्वा येथील जॉली बीचवर सहल गेली होती. तेथील बीचवर सर्व खेळाडूंचे शरीर प्रदर्शन करतानाचे छायाचित्र चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला. यामध्ये काहींनी रोहित लोकेश राहुलच्या मागे लपून त्याचे पोट कसे लपवत आहे, अशी टिप्पणी केली. तर काहींनी इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे यांना खरोखरच अधिकाधिक अन्नधान्य ग्रहण करण्याची आवश्यकता आहे, असे सुचवले.

कोहलीची दुसरी बाजू

दुसरम्य़ा कसोटीचा पहिला दिवस पार पडल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या ड्रेसिंग रूममध्ये माघारी परतले. परंतु या दरम्यानच चाहत्यांना कोहलीची दुसरी बाजू पहावयास मिळाली. दिवसाचा खेळ संपल्यानंतरही विराट चाहत्यांच्या आग्रहास्तव खास त्यांना स्वाक्षरी देण्यासाठी व त्यांच्यासह सेल्फी काढण्यासाठी स्टॅण्डमध्ये गेला.

रोहित-जडेजा यांचे नकलांचे खेळ

एकदिवसीय मालिकेदरम्यान रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांच्यातील सर्व संघातील खेळाडूंची नक्कल करतानाचा व्हीडीओ फार व्हायरल झाला. विशेषत: जडेजाने कोहलीची ज्या प्रकारे नक्कल केली, त्याला चाहत्यांची वाहवा मिळाली. त्याचप्रमाणे रोहितला कसोटी मालिकेसाठी अंतिम संघातून वगळल्यावर अनेकांनी कोहलीपुढे पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले. जडेजाच्या नकलेवर रोहित दिलखुलास हसल्यामुळे कोहलीला राग आला असावा, अशीही चर्चा नेटकर्यांमध्ये रंगली होती.

First Published on September 5, 2019 7:51 am

Web Title: indian team windies tour off the field abn 97
Next Stories
1 टेस्टी टिफिन : फिरंगी निवगऱ्या
2 निर्मळ भक्तीचे भान
3  रशियन चिकन कबाब
Just Now!
X