News Flash

उत्तेजक सेवनाचा मार्ग बंदीकडे..

रशियामध्ये २००८ पासून उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे प्रकार समोर येऊ लागले.

ऑफ द फिल्ड :  संकेत गोलतकर

काही दिवसांपूर्वीच क्रीडाविश्वामध्ये धक्कादायक घटना घडली. मॉस्कोच्या प्रयोगशाळेत उत्तेजक चाचणींच्या अहवालामध्ये फेरफार केल्यामुळे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) रशिया या देशावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्या कारणास्तव त्यांना २०२० मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि २०२२ च्या हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेता येणार नाही आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अशा प्रकारची बंदी घातलेला रशिया हा पहिलाच देश ठरला आहे.

रशियाचा इतिहास

रशियामध्ये २००८ पासून उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे प्रकार समोर येऊ लागले. तेव्हा मूत्र चाचण्यांच्या नमुन्यांमध्ये बदल केल्यामुळे एकूण सात धावपटूंना बीजिंग ऑलिम्पिकमधून निलंबित करण्यात आले होते. २००९ ला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार संपूर्ण जगात २००१ ते २००९ या नऊ वर्षांमध्ये एकूण २७३७ खेळाडूंनी उत्तेजक चाचणीचे सेवन केले होते. त्यांमध्ये सर्वाधिक रशियाच्या खेळाडूंचा समावेश होता. त्यानंतर २०१६ ला सादर करण्यात आलेल्या मॅकलारेन अहवालानुसार २०११ ते २०१५ या पाच वर्षांमध्ये रशियाचे ६४३ खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले होते. त्यांमध्ये सर्वाधिक १३९ धावपटू होते. २०१६ रिओ ऑलिम्पिकची सुरुवात होण्याअगोदर रशियाच्या २७८ खेळाडूंपैकी १११ खेळाडूंना उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्यांचा प्रवेश नाकारला होता.

उत्तेजन पदार्थाचे सेवन  केलेले खेळाडू

आजपर्यंत संपूर्ण जगामध्ये अनेक खेळाडूंनी उत्तेजन पदार्थाचे सेवन केले आहे. त्यांमधील काही मोजक्या खेळाडूंचा आपण आढावा घेणार आहोत. सौदी अरेबियाची सुलतान अल दावूदीला २००९ मध्ये डिस्कस थ्रो प्रकारात दोन वर्षे बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली. २०१२ मध्ये भारताची धावपटू अश्विनी अक्कूनजी स्पिटिंग प्रकारात उत्तेजन चाचणीत दोषी आढळल्यामुळे तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर २०१५च्या लांब उडी प्रकारात नायजेरियाच्या चिनाझा अमाडीवर चार वर्षे बंदी घालण्यात आली. २००० मध्ये भारताच्या सीमा अंटीलला डिस्कस थ्रो प्रकारात दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. २०११च्या अर्धमॅरेथॉनमध्ये उत्तेजन चाचणीत दोषी आढळल्यामुळ आर्यलडच्या मार्टिन फगानवरे दोन वर्षांची बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर स्पिटींग प्रकारात ब्राझीलचा वेंडा गोम्स २०१४ मध्ये  दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली.

ऑलिम्पिक बंदीच्या घटना

१. ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी, तुर्की आणि बेल्जियम या पाच देशांनी पहिल्या महायुद्धात सहभाग घेतल्यामुळे त्यांना १९२० मध्ये बेल्जियम येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समितीने बंदी घातली होती.

२. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि जपान या दोन देशांचा समावेश असल्यामुळे त्यांना १९४८ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दिले नाही.

३. दक्षिण आफ्रिका देशाने १९६४ च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये फक्त गोऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी सांगितले. त्यामुळे काळ्या खेळाडूंवर अन्याय झाला. काळे आणि गोरे खेळाडू असा भेदभाव केल्यामुळे दक्षिण आफ्रिका देशावर वर्णभेद शासन कायद्यानुसार ऑलिम्पिक  समितीने तीस वर्षांची बंदी घातली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:34 am

Web Title: international olympic games akp 94
Next Stories
1 ‘रोझ’चेच डे
2 नागरी जमीन कमाल धारणा ; कलम २० अंतर्गत नव्या सवलती 
3 स्वादिष्ट सामिष : खेकडा बॉम्ब
Just Now!
X