|| ज्योती चौधरी-मलिक

साहित्य १ तांदूळ भिजवलेले, ३ मोठे चमचे किसलेला गूळ, १ वाटी खोवलेलं ओलं खोबरं, ३ मोठे चमचे तूप, १०-१२ काजू, किसमिस, सुंठ आणि वेलची पावडर अर्धा चमचा, मीठ चिमूटभर

कृती एका नॉन स्टिक भांडय़ात तूप गरम करा. काजू आणि किसमिसचे तुकडे त्यावर परतून घ्या. त्यानंतर त्यावर तांदूळ घालून हलक्या हाताने परतून घ्या. त्यावर २ कप पाणी घालून पुन्हा हलवून घ्या. आता त्यावर ओलं खोबरं, सुंठ आणि वेलची पावडर घालून एकजीव करून घ्या आणि उकळी येण्याची वाट बघा. उकळी आली की, मात्र गूळ घाला आणि पाणी आटेपर्यंत कमी आचेवर ठेवा आणि अधून मधून हलवत राहा.