27 October 2020

News Flash

जुन्या-नव्याचे चांगले मिश्रण

मोटारीत बदल करण्यासाठी ग्राहकांकडून अभिप्राय घेण्यात आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

जग्वार लँड रोव्हर इंडियाने बुधवारी नवीन जग्वार एक्सई भारतीय बाजारात दाखल केली आहे. नवी जग्वार ही एस आणि एसई दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. एस आणि एसई पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली नवीन जग्वार एक्सई १८४ केडब्ल्यू इंगेनियम टूबरेचाज्र्ड पेट्रोल पॉवरट्रेन आणि १३२ केडब्ल्यू इंगेलियम टूबरेचाज्र्ड डिझेल पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या वर्षी जग्वारने भारतीय बाजारात दाखल केलेली ही एकमात्र गाडी आहे. नव्या जग्वार एक्सईची स्पर्धा बीएमडब्ल्यू शृंखला ३, मर्सिडीज बेन्झ सी क्लास आणि ऑडी ४ या गाडय़ांशी होणार आहे.

‘जग्वार एक्सई’ ही स्पोर्ट्स सलून मोटारींच्या प्रकारांत मोडते. नव्या जग्वारमध्ये डिझाइन, तंत्रज्ञानविषयक सुधारणा केल्या आहेत. या बदलांना ग्राहक सकारात्मक प्रतिसाद देतील असे, जग्वार लँड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी यांनी म्हटले.

मोटारीत बदल करण्यासाठी ग्राहकांकडून अभिप्राय घेण्यात आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गाडीच्या डिझाइनवर जग्वारच्या एफ टाइपचा मोठा प्रभाव दिसून येतो. गाडीचे पुढील बम्पर आणि हेडलाइटची रचना पाहता हा प्रभाव लगेच अधोरेखित होतो. नवी जग्वार एक्सई पूर्वीपेक्षा अधिक मोठी असून तिची जमिनीपासूनची उंची कमी आहे. गाडीचा लुक अधिक स्पोर्टी करण्यात आला आहे. तर हेडलाइटचा आकार लहान केला आहे. एअर इन्टेक ग्रिलचा आकार मोठा करण्यात आला आहे. मोटारीत एलईडी हेडलाइट्ससह इंटीकेटर्स आकर्षक दिसतात. मोटारीचे बारीक टेल लाइटदेखील सुधारित आहे. यामुळे गाडी अधिक आक्रमक दिसते. बाह्य झिाइनमध्ये जाणूनबुजून शैलीदार घटकांचा मर्यादित वापर केला आहे. यामुळे मोटारीचे डिझाइन अधिक आकर्षक ठरते आणि लक्ष विचलित होत नाही.  मोटारीला १७ इंची चाके देण्यात आली आहेत.

अपेक्षेप्रमाणे इंटिरिअरसाठी चांगल्या दर्जाचे साहित्य वापरल्याचे दिसते. सेंट्रल कन्सोलमध्ये एफ टाइपप्रमाणे गिअर बदलण्याची यंत्रणा देण्यात आली आहे. मोटारीत ८ स्पीड गिअरबॉक्स आहे. सामान ठेवण्यासाठी जास्त जागा या नव्या अंतर्भागात देण्यात आली आहे. गाडीचे स्टिअरिंग पूर्णपणे नवीन देण्यात आले आहे. एक्सईमध्ये नवे १० इंची इन्फोटेन्मेंट स्क्रीन देण्यात आली आहे. यात अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मिरर, ऑडिओ व क्लायमेट सेटिंग्ज, लेन कीप असिस्ट व ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर, आगमनाचा अंदाजे वेळ अशा अनेक सोयी देण्यात आल्या आहेत. त्यासह हवेची गुणवत्ता सांगणारी प्रणालीदेखील देण्यात आली आहे.  मोटारीच्या एकूण रचनेत ७५ टक्के अ‍ॅल्युमिनियम वापरण्यात आले आहे. सुरक्षेसाठी गाडीत ६ एअर बॅग देण्यात आल्या आहेत. गाडीत एबीएस, हिल असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, लेन कीप असिस्ट, हॅन्ड्स फ्री पार्किंग, टायर प्रेशर मॉनिटर या सेवादेखील पुरवण्यात आल्या आहेत.

एक्सईमधील बीएस ६ इंजिन देण्यात आले असून याव्यतिरिक्त इंजिनच्या क्षमतेत कोणताच बदल करण्यात आला नाही. एक्सईमध्ये चार सिलिंडरचे ए २.० टबरे इंजिन आहे. यातून २५० एचपी आणि ३६५ एनएम टॉर्क निर्माण होतो. तर टबरे डिझेल इंजिनमध्ये १८० एचपी आणि ४३० एनएम टॉर्क निर्माण होतो. गाडीत ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.

वैशिष्टय़े

नवीन सुधारणा आणि तंत्रज्ञान

सुधारित बम्पर्स,  फुल एलईडी हेडलाइट्ससह डीआरएल १० इंची इन्फोटेन्मेंट स्क्रीन, दुरूनच कारची स्थिती तपासण्याची सुविधा, अँड्रॉइड ऑटो व अ‍ॅपल कार प्लेची सुविधा, वायरलेस डिव्हाइस चार्जिग, एअर क्वॉलिटी सेन्सर अशी वैशिष्टय़े

किंमत ४४.९८ लाख रुपये.  जग्वार एक्सई एस (पेट्रोल / डिझेल) 

४६. ३३ लाख रुपये. जग्वार एक्सई एसई (पेट्रोल / डिझेल )

vaibhavbhakare1689@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 2:01 am

Web Title: jaguar land rover in the indian market jaguar xe akp 94
Next Stories
1 बाजारात नवीन काय?
2 अध्यात्म आणि कलेचा संगम
3 झँडर मासा
Just Now!
X