News Flash

आरोग्यदायी आहार : ज्वारी उपमा

ज्वारी धुऊन आठ तास भिजवावी.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. सारिका सातव

साहित्य

* ज्वारी- एक कप

* तेल- २ चमचे

* जिरा, धने, मोहरी- आवश्यकतेनुसार

* उडीद डाळ- एक चमचा

*कांदा- एक

* हिंग, मीठ, आले- चवीनुसार

* हिरवी मिरची- बारीक कापून

* इतर भाज्या कापून- एक वाटी

* हळद- पाव चमचा

कृती :

* ज्वारी धुऊन आठ तास भिजवावी.

* हळद व मीठ घालून भिजवलेली ज्वारी कुकरमध्ये शिजवावी.

* कढईत तेल गरम करून हळद, जिरे, मोहरी, कढीपत्ता व उडीद डाळ टाकून फोडणी द्यावी.

* चिरलेला कांदा व मिरची टाकून परतून घ्यावे.

* कांदा गुलाबी रंगावर भाजून चिरलेल्या भाज्या हळद, मीठ, पाणी टाकून थोडा वेळ शिजवाव्या.

* शिजवलेली ज्वारी त्यात टाकून चांगले परतून घ्यावे.

* कोथिंबीर व खोबरे टाकून सजवावे.

वैशिष्टय़े

* नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ.

*  कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 12:11 am

Web Title: jowar upma recipe abn 97
Next Stories
1 योगस्नेह : आकर्ण धनुरासन
2 आजारांचे कुतूहल : कार्पल टनेल सिंड्रोम
3 मर्सिडीझ बेंझची नवी व्ही क्लास एलिट
Just Now!
X