News Flash

खाद्यवारसा : काळीमिरी पराठा

पॅनमध्ये १ चमचा तूप घ्या. त्यात वाटलेले काबुली चणे हलकेच परतून घ्या आणि थंड होऊ द्या.

(संग्रहित छायाचित्र)

ज्योती चौधरी-मलिक

साहित्य-

दीड कप गव्हाचे पीठ, खोवलेले ओले खोबरे पाव कप, उकडून वाटलेले काबुली चणे पाऊण कप, १ चमचा काळीमिरी पूड, मीठ स्वादानुसार, पराठे भाजण्यासाठी तूप.

कृती – 

पॅनमध्ये १ चमचा तूप घ्या. त्यात वाटलेले काबुली चणे हलकेच परतून घ्या आणि थंड होऊ द्या. मग गव्हाच्या पिठात ते मिश्रण खोबरे, मीठ, काळीमिरी, १ चमचा तूप घालून पीठ मळून घ्या. हे १५ मिनिटे झाकून ठेवा, नंतर त्याच्या छोटय़ा छोटय़ा लाटय़ा

बनवून पराठे लाटून घ्या. तवा गरम झाल्यावर पराठय़ाला तूप लावून खरपूस भाजून घ्या. लोणी किंवा चटणीबरोबर गरम गरम खा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 4:32 am

Web Title: kalimiri paratha recipe
Next Stories
1 शहरशेती : नैसर्गिक खते, कीटकनाशके
2 दिवाणखान्यातील ‘सोबती’
3 छायाचित्रणाची आश्वासक सुरुवात
Just Now!
X