14 December 2019

News Flash

योगस्नेह : कटी चक्रासन

कटी म्हणजे कंबर. कटी चक्रासन म्हणजे कंबरेतून शरीर फिरवणे होय

कटी म्हणजे कंबर. कटी चक्रासन म्हणजे कंबरेतून शरीर फिरवणे होय. या आसनामुळे कंबरेला ताण बसून ती आणखी लवचिक बनते. या आसनामुळे अपचनाची तक्रार दूर होते.

कृती :

*  दोन्ही पायांत काही अंतर ठेवून उभे राहा.

*   श्वास घेत दोन्ही हात सरळ पुढे करा. तळहात एकमेकांकडे करून हात जमिनीला समांतर ठेवा.

*   श्वास सोडत कंबरेला पीळ देऊन हळुवार उजवीकडे वळा. उजव्या खांद्यावरून मागे पाहा.

*   तळहातातील अंतर एकसारखे राहू द्या. श्वास घेत आसन सोडा.

*   आता डाव्या बाजूला वळत आसन करा.

First Published on May 28, 2019 3:21 am

Web Title: kati chakrasana yoga
Just Now!
X