शुभा प्रभू साटम

साहित्य :

चिकन खिमा, गरम मसाला, ड्राय हब्र्ज, रेड चिली फ्लेक्स, मीठ, बासमती तांदूळ, पाणी.

कृती

चिकन खिमा धुवून त्याला गरम मसाला किंवा आवडीचा मसाला, ड्राय हब्र्ज आणि मीठ लावून ठेवा. बासमती तांदूळ अर्धा तास भिजत घाला. यानंतर निथळून घ्या. त्यात मीठ आणि रेड चिली फ्लेक्स घाला. खिम्याचे गोल गोळे करून या भिजवलेल्या तांदळात व्यवस्थित लपेटून घेऊन चाळणीत ठेवा. दहा-पंधरा मिनिटे उकडून घ्या. बिन तेला-तुपाचा पौष्टिक प्रकार तयार. शाकाहारी असाल तर सोया खिमा वापरा.