ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

खिमा अर्धा किलो, मटार १ वाटी, बारीक चिरलेले कांदे २, बारीक चिरलेला टोमॅटो १, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, चिरलेली कोथिंबीर, धने-जिरे पावडर १ चमचा, लाल मिरची पावडर २ चमचे, खोवलेलं ओलं खोबरं १ वाटी, हळद अर्धा चमचा, हिंग चिमूटभर.

कृती

भांडय़ात तेल तापवा. त्यात कांदा परता. आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो परता. हळद घाला. खिमा घालून छान परता. लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर घाला. परतून घ्या. झाकून शिजत ठेवा. शिजत आल्यावर मटार घाला. ओलं खोबरं घाला. परत थोडं शिजवा. जास्त पातळ करू नका. शेवटी कोथिंबीर घाला.