|| डॉ. वृषाली सूरवाडे-सावंत

  • अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझरचा वापर करा. प्रभाव अधिक काळ राहतो.
  • सुंगधमुक्त मॉइश्चराइझर वापरा. व्हाइट सॉफ्ट पॅराफिन आणि शीया बटर असलेले मॉइश्चरायझर वापरा.
  • हिवाळ्यात हवा कोरडी असल्याने स्वेटर, हातमोजे, पायमोजे यांचा वापर करावा.
  • हिवाळ्यात कठोर क्लीजनर, फेसवॉश, नीम साबण वापरण टाळा. त्यामुळे त्वचा लाल होऊ शकते.
  • मेकअप करताना टाल्कम पावडर वापरू नका. त्याऐवजी तेल असलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करा.
  • क जीवनसत्त्व आणि ई जीवनसत्त्व असलेले सीरम वापरा.
  • अंघोळ करण्यासाठी खूपच गरम किंवा अत्यंत थंड पाणी वापरणे टाळा.
  • सोरियासिस, एटोपिक डार्माटायटिस, एक्झामा यांसारखे विकार हिवाळ्यात होतात. त्यामुळे योग्य वेळी त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.