कोकम म्हणजे ‘कूल’ भावना. नुसतं नाव घेतलं तरी पोटात थंड पडतं. अशा या कोकमच्या साथी लिंबांचं सरबत, साखर घालून जर का मिश्रण बनवलं, तर रणरणीत उन्हातही घशाची कोरड कमी होते. अशा या ‘कूल कूल’ कोकमाचं  हे गुपित..

साहित्य

* लिंबाच्या ४ फोडी
* २ कोकम साले
* २० मिली साखरेचे सिरप
* ५० मिली कोकमाचा ज्यूस
* बर्फ आणि सोडा.

कृती

सर्वप्रथम शेकरमध्ये लिंबाच्या फोडींचा रस काढून घ्या. आता पिळलेल्या फोडीसुद्धा त्यात टाका. त्यातच कोकम टाका आणि थोडेसे खलून घ्या. आता यामध्ये साखरेचे सिरप टाका. कोकमाचा रस टाका. हे छान घुसळून घ्या. त्यावर बर्फ घाला आणि पुन्हा एकदा झक्कास शेक करून घ्या. आता छानशा ग्लासामध्ये हे मिश्रण ओता आणि वरून सोडा घाला.