नीलेश लिमये

नाव मोठ्ठं असलं तरी हा पदार्थ मात्र करून पाहायला अगदी सोप्पा आहे. नक्की करा आणि कसा झालाय ते मला जरूर कळवा.

साहित्य

* २-३ मध्यम आकाराचे बटाटे

*  कोथिंबीर.

* लहान दुधीभोपळा

* ५-६ चेरी टोमॅटो

* १ वाटी क्रीम

* चिली फ्लेक्स

* ५-६ लसूण पाकळ्या

* मीठ – मिरपूड

कृती

बटाटे आणि दुधी स्वच्छ धुऊन घ्या. बटाटय़ांची सालं काढून ते किसून घ्या. दुधी मात्र सालासकट किसून घ्या. एका तसराळ्यात बटाटे आणि दुधीचा कीस, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, मीठ, मिरपूड एकत्र करा. चेरी टोमॅटोचे दोन तुकडे करून घ्या. एका तव्यावर आधी टोमॅटो परतून घ्या. ते बाजूला काढून ठेवा. आता बटाटे आणि दुधीभोपळ्याच्या किसाचे मिश्रण या तव्यावर थापून छोटी छोटी थालीपिठे करून घ्या. यालाच स्वित्झर्लंडमध्ये रोस्टी म्हणतात. ही रोस्टी तेलावर किंवा तुपावर दोन्ही बाजूंनी खरपूस परतून घ्या. आणि गरमागरम खायला घ्या. त्यावर परतलेले टोमॅटो घाला. सार क्रीमसाठी. वाटीभर क्रीममध्ये थोडासा लिंबाचा रस घालून ते फेटून घ्या. यात चीझही वापरता येईल. भारतीय चव हवी असेल तर सोबत चटणीही देऊ शकता.