नवलाई :  ‘एफ अँड डी’चा ब्लूटुथ हेडफोन

‘एफ अँड डी’ या देशातील जुन्या ब्रँडने ‘एचडब्ल्यू१११’ नावाचा नवीन ब्लूटुथ हेडफोन भारतीय बाजारात आणला आहे. दिसायला आकर्षक, सहज दुमडता येण्याची सुविधा, चामडी आवरण ही हेडफोनची मुख्य वैशिष्टय़े आहेत. या हेडफोनच्या दुहेरी ‘इअरशेल’मुळे गोंगाट व व्हायब्रेशनमध्ये घट होऊन आवाज सुस्पष्टपणे ऐकू येतो, असा कंपनीचा दावा आहे. एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १८ तास हा हेडफोन व्यवस्थित काम करतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये इनबिल्ट मायक्रोफोनची सुविधा देण्यात आली असल्याने या हेडफोनद्वारे तुम्ही संभाषणही करू शकता. दहा मीटरच्या परिघात याची ब्लूटुथ मर्यादा आहे. हा हेडफोन सध्या ‘स्नॅपडील’ या ई-कॉमर्स संकेतस्थळावर तसेच अन्य रिटेल दुकानांत उपलब्ध आहे.

किंमत : २४९० रुपये

 

‘आयसन’चा अल्ट्रा एचडी एलईडी टीव्ही

‘आयसन’ या नव्या ब्रॅण्डने ‘अ55वऊर972’ हा आयपीएस पॅनल असलेला ‘फोर के’ अल्ट्रा एचडी एलईडी टीव्ही बाजारात आणला आहे. उत्तम ‘ब्राइटनेस’, आकर्षक रंगसंगती या टीव्हीची वैशिष्टय़े आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये १.५ गिगाहार्ट्झ क्षमतेचा क्वाडकोअर प्रोसेसर असून दोन जीबी रॅम आणि १६ जीबी ‘रॉम’ (स्टोअरेज) यामुळे हा वेगाने दिलेल्या सूचना पाळतो. यातील इनबिल्ट डॉल्बी ऑडिओमुळे उत्तम सराऊंड साऊंडचा अनुभव मिळतो.

किंमत : ५५,९५० रुपये

‘जेव्हीसी’चा २.१ स्पीकर

व्हिएरा ग्रुपच्या ‘जेव्हीसी’ या ब्रँडने ‘XS-XN21l’ हा २.१ होम ऑडिओ स्पीकर बाजारात आणला आहे. दमदार साऊंड ड्रायव्हर्स आणि उत्तम परिणाम साधणारा ध्वनी या स्पीकरची वैशिष्टय़े आहेत. स्पीकरवर एलईडी स्क्रीन पुरवण्यात आली असल्याने त्यावरून स्पीकर हाताळता येतो. ५०० वॅट पीएमपीओच्या ताकदीतून आवाजातील अप्रतिम सुस्पष्टता देणारा हा स्पीकर स्टाइल आणि रफनेस यांचा उत्तम संगम आहे. ४ इंची सबवुफर सिस्टममुळे शक्य तितका मोठा आवाज मिळतो.

किंमत : ५९९९ रुपये.

‘झिऑक्स’चा नवीन फीचर फोन

साधा मोबाइल अर्थात फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या भारतात आजही लक्षणीय आहे. गरीब, मजूर वर्गातील जनतेसाठी स्वस्त दरातील फीचर फोन हे संवादासाठीचे महत्त्वाचे माध्यम आहे. याच वर्गाला डोळय़ासमोर ठेवून ‘झिऑक्स’ मोबाइलने ‘झेड १८’ हा नवीन फीचर फोन भारतात आणला आहे. १८०० क्षमतेची बॅटरी, स्वतंत्र संगीत नियंत्रण सुविधा, वायरलेस एफएम, एलईडी टॉर्च, ऑटो कॉल रेकॉर्डिग अशी या फोनची वैशिष्टय़े आहेत. ‘झेड१८’ मध्ये २.४ इंचाची ब्राइट डिस्प्ले असलेली मोठय़ा आकाराची स्क्रीन असण्यासोबतच ग्लॉस फिनिश रचना आहे.  या फोनमध्ये प्रायव्हसी लॉक वैशिष्टय़ आणि मोबाइल ट्रॅकरची सुविधा आहे.

किंमत : १८६० रुपये.