26 February 2021

News Flash

करोनाष्टक : कुटुंब रंगलंय वेबिनारमध्ये

टाळेबंदीमुळे  दर शनिवार-रविवार वेबिनारच्या माध्यमातून एकत्र येत आम्ही मस्त आनंद घेत आहोत.

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव.. 

coronafight@expressindia.com

सतीश कुलकर्णीदेशमुख, नांदेड : आमचा देशमुख-कुलकर्णी परिवार खूप मोठा आहे. नांदेड, परभणी, औरंगाबाद, पुणे, मुंबई, राजगुरूनगर, अहमदाबाद, फोंडा (गोवा), बंगळूरु, अहमदाबाद,  दिल्ली आणि नायजेरिया अशा विविध ठिकाणी वसलेल्या आमच्या कुटुंबीयांची संख्या आजमितीला ६२ आहे. कुटुंबातील विवाह प्रसंगाशिवाय फार कमी वेळा आम्हास एकत्र येण्याची संधी लाभते. टाळेबंदीमुळे  दर शनिवार-रविवार वेबिनारच्या माध्यमातून एकत्र येत आम्ही मस्त आनंद घेत आहोत. गाण्याच्या भेंडय़ा, गेम शो, मस्ती की पाठशाला अशा विविध कार्यक्रमांतून लहान-थोर सहभाग घेतात. या कार्यक्रमाची धमाल अ‍ॅड करण्यासाठी दर आठवडय़ाला युवा वर्ग नवनवीन शक्कल लढवतो. एका कार्यक्रमात  कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ ८२ वर्षांच्या आमच्या वडीलभावाची व वहिनींची नातीने अफलातून मुलाखत घेतली.  माझे वडील कै.गोविंदराव देशमुख हे हंशा आणि टाळ्यांसह गप्पांची मैफल रंगविण्यात सदैव अग्रेसर असत. टाळेबंदीमधील निवांतपणामुळे तोच अनुभव सध्या आम्ही नव्याने घेत आहोत. आमच्या एका भावाने या काळात ‘वंश वृक्षा’चा प्रकल्प हाती घेत कुटुंबाची चारशे वर्षांची माहिती संकलन करून ऐतिहासिक कामगिरी बजावली. नायजेरियातील पुतण्याने वेबवर समालोचन करत साऱ्या देशाची सैर घडवली. एकू ण सारे एकत्र येऊन ऑनलाइन माध्यमांचा आधार घेत, करोनाकाळ सुसह्य़ बनवत आहे.

वाचाल तर वाचाल

राम जोशी, कानडखेडकर, नांदेड : मी बँके तून सेवानिवृत्त झालेला एक अधिकारी. निवृत्तीचा दिनक्रम चांगला अंगवळणी पडत होता तोच करोनाचे थैमान सुरू झाले. के वळ भाजीपाला आणि एखादी प्रभातफे री एवढाच काय तो बाहेरचा वावर होता. काही दिवसांनी तोही बंद पडला. सुरुवातीला फार कं टाळा आला पण नंतर मी या परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहायचे ठरवले. राहून गेलेले वाचन करायचे ठरवले. शेषराव मोरे, नरहर कु रुंदकर, रणजित देसाई आदी लेखकांचे साहित्य वाचू लागलो. मी शेतकऱ्याचा मुलगा. आम्हा भावंडांना वडील कायम सांगत, मुलांनो वाचाल तर वाचाल. वाचनाची सवय लावून घ्या. पहाटे तीन ते सात सलग वाचन करतो. त्यानंतर योगाभ्यास, स्वयंपाकघरात थोडी मदत. दुपारी जेवल्यानंतर पुन्हा वाचन. ज्येष्ठ मित्रबंधू प्रा. उपेंद्र कुलकर्णी यांनी त्यांच्याकडली बरीच पुस्तके  वाचायला दिली. या सगळ्याबरोबर आम्ही सफाई कामगार, पोलीस, डॉक्टर्स या सगळ्या आपल्या योद्ध्यांसाठी काही करण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. सामाजिक जाणिवेचे भान ठेवून सफाई कामगारांना काही वेळा चहा-नाश्ता देतो. हातावर पोट असलेल्या गरजूंसाठी मदत के ली आहे. या संकटापुढे ही मदत फारच कमी आहे, याची जाणीव आहे, परंतु या संकटावर मात करण्यात खारीचा वाटा प्रत्येकाने उचलायला हवाच, या भावनेने ती करतो आहोत.

अविरत शिक्षणाचा ध्यास

स्पृहा सुरेश इंदू  : मी चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा, चेंबूर मुंबई येथे २१ वर्षे शिक्षिका म्हणून सेवेत आहे. करोनामुळे १५ मार्चपासून सक्तीची सुट्टी  मिळाली. परंतु माझे इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आणि मी या काळात नेमके काय करायचे हा प्रश्नच आला नाही. माझ्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सतत तंत्रज्ञानाच्या मदतीने संपर्कात राहिले. ऑनलाइन मीटिंग्ज, मीट्स, कॉलिंग याचे आधुनिक तंत्रज्ञान माझे विद्यार्थी सराईतपणे वापरत आहेत. ऑनलाइन टेस्ट सोडवत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळेसर विद्यार्थ्यांशी, पालकांशी ऑनलाइन संवाद साधत होते. मी स्वत: शिक्षक म्हणून व्यवसायिक विकास व्हावा या दृष्टीने १३ विविध ऑनलाइन कोर्सेस या काळात केले. आपल्या बाई काही नवनवीन शिकत आहेत, हे पाहून विद्यार्थ्यांना गंमत वाटली, प्रोत्साहन मिळाले. माझ्या चौदा विद्यार्थ्यांनी श्लोक, चित्रकला आणि गायनाच्या ऑनलाइन स्पर्धामध्ये भाग घेतला. चंद्रपूर आकाशवाणी के ंद्राकरिता दोन विद्यार्थ्यांनी ऑडिओ रेकॉर्डिग पाठवले. एकू णच शाळा बंद असली तरी आमचे शिक्षण सुरूच आहे.

करोना योद्धे

पृथ्वी इंगळे, औरंगाबाद : करोनाकाळ येण्याच्या आधी मला दररोज सकाळी लवकर उठून शाळेत जावे लागत असे. पण आता मात्र सुट्टीमुळे खूप झोपायला मिळते. याची सुरुवातीला गंमत वाटली पण नंतर नंतर त्याचे गांभीर्य समजू लागले. घरात बसून अगदी कं टाळा येऊ लागला. मग मी घरातच करमणुकीचे कार्यक्रम पाहत आहे. तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक गोष्टी करत आहे.

रामायण, महाभारत, श्रीकृष्ण या साऱ्या मालिका पाहिल्या. प्राण्यांविषयी, निसर्गाविषयी माहिती देणारे कार्यक्रम पाहतो. कॅ रम खेळतो. तसेच इंग्रजी आणि विज्ञानाचे धडे मी आता यू-टय़ुबवरून गिरवत आहे. आईला घरकामात मदतही करतो आहे. घराची सफाई आणि सजावटीचे कामही मी हाती घेतले आहे.

आपण सगळे घरात निवांत बसू शकतो ते करोना योद्ध्यांमुळे. त्यामध्ये डॉक्टर आहेत, पोलीस आहेत. माझे बाबा महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात काम करत आहेत. या सगळ्यांना माझा सलाम.

प्रश्नमंजुषेची गोडी 

सिद्धेश शंकर भांडुगळे, मानखुर्द : मी छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी पनवेल येथे बीई मेकॅ निकलचे शिक्षण घेत आहे. सध्या शेवटच्या वर्षांला आहे. शेवटची सत्र परीक्षा बाकी आहे त्यामुळे मार्चपासून टाळेबंदी लागल्यापासून मी अभ्यासाबरोबर माझा छंद जपण्याचा निश्चय केला. रोज सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार घालतो, योगासने करतो. कारण उत्तम शरीर हीच संपदा. प्रश्नमंजुषा हा प्रकार लहानपणापासून आवडत होता. विविध संस्थांच्या  प्रश्नमंजुषेमध्ये ऑनलाइन, ऑफलाइन सहभागी झालो. त्यातून खूप माहिती मिळाली. करोनाविषयक संपूर्ण शास्त्रीय, वैज्ञानिक माहिती या  प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून मिळवली आहे.

आव्हान स्वीकारले !

डॉ. संजय जानवळे, बीड : करोनाविरुद्धच्या लढय़ातील टाळेबंदी हे एक महत्त्वाचे अस्त्र. ते सुरू झाल्यानंतर माझ्या दिनक्रमात फारसा फरक पडलेला नव्हताच, कारण एरव्हीही  मी महिना-महिना आमच्या रुग्णालयाबाहेर पडत नसे. रुग्णालयाच्या वरच घर असल्याचा तो एक फायदा असतो म्हणा. माझ्या मुलांसाठी हा टाळेबंदी हा प्रकार नवा असला तरी माझ्यासाठी नाही. मी एमबीबीएसला असताना विद्यापीठ नामांतरणाच्या वेळी औरंगाबादेत काही काळ संचारबंदी लागू के ली होती. त्याच्या कटू आठवणी मनात आहेत. तर संपूर्ण टाळेबंदीमुळे सर्वत्र शांततेचे साम्राज्य होते. दिवसभर कडक ऊन, संध्याकाळी पाऊस पडला तेव्हा वातावरण जरा आल्हाददायक असले तरी मन मात्र सुन्न झाले होते. घरात मुले कॅ रम, बुद्धिबळ खेळत होते, कधी टीव्ही पाहत होते; पण त्यांनाही जगभरात तांडव माजवणाऱ्या करोनाची भीती स्पष्ट जाणवत होती. खरे सांगायचे तर, भीती तर माझ्या मनालाही जाणवत होती; परंतु रुग्णसेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने आम्हाला घरी थांबणे शक्यच नव्हते. या परिस्थितीत आम्हीही तसे घरात बसू शकलो नसतो. मी नियमित व्यायाम करतोच; परंतु या काळात व्यायामशाळाही बंद होत्या. मग घरीच व्यायाम करणे आणि पौष्टिक खाणे या गोष्टींवर भर देऊन रुग्णसेवेसाठी बाहेर पडलो. रुग्णांना माझी गरज आहे. त्यामुळे मनोभावे ते काम मी करतो. त्यानंतर आत्मिक समाधान मिळते, सुखाची झोप लागते, हे अतिरिक्त फायदेच की. करोनाशी दोन हात करण्यासाठी आपल्या सर्वानाच निरोगी राहण्याची गरज आहे. करोनाविरुद्धच्या लढय़ाचे हे आव्हान मी घेतले आहे.

शेतीचा अभ्यास

अभिजीत गोडसे, सातारा 

मी विद्यार्थी आहे. तसेच पाणी फाऊंडेशन या संस्थेत समन्वयक म्हणून काम पाहत आहे. टाळेबंदीच्या काळात खूप वेळ मिळाला आहे. या वेळात ग्रामीण भागाच्या विकासासाठी काय करता येईल, शेतीविषयक सुधारणा कशा अमलात आणता येतील, यावर मी अभ्यास करत आहे. ग्रामीण भाग हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गांधीजींनी सांगितले होते, खेडय़ांकडे चला. आज करोनाकाळात तर याचा प्रत्यय येत आहे. खेडय़ांचा पुरेसा विकास झाला असता तर शहरांकडे जाण्याची वेळ मजुरांवर आली नसती, असे मला वाटते. पारंपरिक शेती करताना त्यातून निसर्गसंवर्धन आणि नफा ही दोन्ही उद्दिष्टे कशाप्रकारे साध्य होतील, याचा विचार करत आहे.  त्यावर तज्ज्ञांनी लिहिलेले साहित्य वाचत आहे. शरद जोशी यांनी लिहीलेली शेतीची भगवद्गीता वाचून काढली. गिरीश कु बेर यांची एका तेलियाने, पुतिन, युद्ध जीवांचे ही पुस्तके ही वाचली.

 वेळेचा सदुपयोग

दीपाली फाळे : मानवी जीवन म्हटल्यावर अडचणी येतातच. करोना ही अशीच एक आपत्ती. पण आपण त्याला कसे सामोरे जातो, हे महत्त्वाचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी राजस्थानमध्ये सरकारी शाळांसोबत काम करते आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रात गावी येण्याचे तिकीट काढले होते. पण ते करोनामुळे रद्द झाले. मी खट्टू झाले, पण घाबरले नाही. माझ्या दिवसाची सुरुवात ही घराच्या अवतीभवती ४० मिनिटे चालूनच होते. त्यानंतर दोरीउडय़ा. मग लोकसत्ताचे वाचन.  मला शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे वाचते, समजून घेते. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांचे विचार ऐकते. शैक्षणिक क्षेत्रात चाललेल्या नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेत आणि वाचनातून जी नवीन शिक्षण क्षेत्राची माहिती मिळते ती संपर्कामध्ये असलेल्या शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना पाठवते. गोष्टींची पुस्तके वाचायला वेळ देते. त्यानिमित्ताने बालपणात डोकावण्याचा व आठवणींना उजाळा देण्याचा आनंद मिळतो तो वेगळाच. गावी तीन बहिणी आणि आई आहे. त्यांच्याशी दिवसातून एकदा फोनवर बोलणे होतेच. आत्ताच दोन दिवसांपूर्वीच एका संस्थेत स्वयंसेवक होण्यासाठी अर्ज केला आहे. त्याचे काय होते ते पाहू. सामाजिक कार्य करण्यासाठी ही माझी धडपड सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 4:24 am

Web Title: loksatta readers creative work at home during lockdown zws 70
Next Stories
1 करोनाष्टक : योगाभ्यासाची गोडी
2 तारांगण घरात : अभिनयासोबत वाचनही..
3 करोनाष्टक : कलाकृतींचा खजिना
Just Now!
X