02 July 2020

News Flash

ऑफरोडचा थरार

लक्झरी कार श्रेणीतील प्रतिष्ठेचे नाव असेलेल्या मर्सिडीज बेंझ या कंपनीने त्यांची जी ३५० डी ही एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल केली. क

|| व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

लक्झरी कार श्रेणीतील प्रतिष्ठेचे नाव असेलेल्या मर्सिडीज बेंझ या कंपनीने त्यांची जी ३५० डी ही एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल केली. लक्झरी कार श्रेणीत भारतात अग्रगण्य असणाऱ्या मर्सिडीज बेंझच्या जी ३५० डी या गाडीला जी-वॅगन या नावाने ओळखले जाते. ऑफरोडवरील दमदार कामगिरीमुळे ही गाडी जगभरात लोकप्रिय आहे. जगातील सर्वोत्तम ऑफरोडर गाडय़ांमध्ये जी-वॅगनचे नाव आदराने घेतले जाते. जी-वॅगनद्वारे मर्सिडीज भारतीय बाजारावर असलेली आपली पकड अधिक घट्ट करू इच्छित आहे.

मर्सिडीज बेंझ भारतीय लक्झरी कार बाजारात अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे.  भारतात या कंपनीच्या अनेक लक्झरी कार आतापर्यंत यशस्वी झाल्या आहेत.  बेंझच्या एएमजी मॉडेल्सचाही यात समावेश आहे. गेल्या काही वर्षांत भारतात एसयूव्ही आणि ऑफरोडिंग वाहनाची संख्या वाढत आहे. प्रत्येक या श्रेणीतील वाहनांना ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.  मर्सिडीज बेंझने प्रथमच जी-क्लाससाठी डिझेलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जी ३५० डीतून ऑफरोडिंगचा अधिक दमदार अनुभव चालकांना देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे. ऑफरोडिंगसाठी जी शृंखलेतील ही सर्वात सक्षम गाडी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

‘‘१९७९ मध्ये निर्मिती झाल्यापासून, जी- क्लास जगभर अतुलनीय व वैशिष्टय़पूर्ण राहिला आहे. लक्झरी ऑफरोड वाहनांमध्ये हा एक मापदंड आहे. मर्सिडीज बेंझने भारतातील ग्राहकांसाठी पहिली डिझेल जी-क्लास दाखल केली आहे. ही गाडी ग्राहकांना हवे तसे बदल करण्याची संधी देते. जी-क्लासमधील ऑफरोडिंग क्षमतांमुळे हे वाहन अधिक आकर्षक ठरते. ४० वर्षांहून अधिक इतिहास असणाऱ्या जी-क्लासने या श्रेणीतील कमालीच्या स्पर्धेमध्ये स्वत:चे खास स्थान निर्माण केले आहे. नव्या रूपातील जी-क्लास ग्राहकांना आवडेल अशी खात्री आहे, असे  मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी सांगितले. २०१९ साठी कंपनी त्यांच्या वाहनांमध्ये बदल करणार असून जी-क्लास त्याचेच उदाहरण असल्याचे कंपनीने सांगितले. ऑफरोडिंगचा उत्तम अनुभव देणारी ही जी वॅगन शहरात दररोज वापरता येणारी गाडी म्हणूनदेखील ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असा कंपनीचा विश्वास आहे.  या गाडीच्या रूपाने विदेशी लक्झरी मोटार ब्रँडसाठीदेखील भारतीय बाजारपेठ किती महत्त्वाची आहे हे दिसून येते.  येत्या काळात कंपनी १५हून अधिक विशेष व एएमजी कार देणार आहे. चौथ्या तिमाहीसाठी उत्पादनांमध्ये विविध बदल करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.

अभिजात शैलीला उजाळा

गाडीची बॉडी ही जी वॅगनच्या अभिजात शैलीला उजाळा देणारी आहे. गाडीत ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग प्रणाली असून ऑल व्हील ड्राइव्ह प्रणाली देण्यात आली आहे.  या गाडीत अनेक बदल करता येऊ  शकतात असा कंपनीचा दावा आहे. या संकल्पनेअंतर्गत गाडीत उत्कृष्ट साहित्याचा वापर केला जातो, असे कंपनीचे म्हणणे आहे. गाडीत विशेष नाप्पा लेदर वापरण्यात आले आहे. गाडीचा अंतर्भाग आणि बाह्य़भागातील अनेक घटक हातांनी तयार केले आहेत. गाडीत उच्च क्षमतेच्या स्टीलची  फ्रेम आणि कम्पोझिट बांधणीची माउंटेड बॉडी आहे.  बॉडी शेलमध्ये विविध ग्रेडच्या स्टीलचा समावेश आहे. तर विंग्स, बोनेट व दारे अल्युमिनिअमपासून बनवलेली आहेत.

नव्या मर्सिडीज बेंझ जी ३५० डीची वैशिष्टय़े

  •       इंजिन : इन-लाइन ६ सिलिंडर      डिसप्लेसमेंट : २९२५ सीसी
  •       आउटपुट :  २१० केडब्ल्यू (२८६ एच पी) @ १२००-३२०० आरपीएम
  •       टॉर्क  : ६०० एनएम @ २५००-३५०० आरपीएम
  •       ड्राइव्ह सिस्टीम :  ऑटोमॅटिक ऑल-व्हील ड्राइव्ह,
  •        रिअर-बाएस्ड टॉर्क डिस्ट्रिब्युशन  ४०:६०
  •        ट्रान्समिशन :  ९ जी- ट्रॉनिक
  •       अक्सिलरेशन :  (०-१०० किमी प्रतितास)  ७.४ सेकंड
  •       टॉप स्पीड :  १९९ किमी प्रति तास
  •       नव्या मर्सिडीज बेंझ ३५०ची किंमत १.५ कोटी  रुपयांपासून, एक्स-शोरूम, भारत अशी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 2:00 am

Web Title: luxury car akp 94
Next Stories
1 फसव्या मुद्दय़ांवर मतदान नको!
2 पम्पकिन लाते
3 क्रीडा क्षेत्रातील अनुभवी तेजांकित!
Just Now!
X