24 January 2019

News Flash

मस्त मॉकटेल : मँगो म्युल

क्लासिक मॉस्को ‘म्युल कॉकटेल’चा हा हंगामी फरक आहे.

मँगो म्युल

क्लासिक मॉस्को ‘म्युल कॉकटेल’चा हा हंगामी फरक आहे. नाव असे सूचित करते की कॉकटेलची निर्मिती रशियात झाली. परंतु खरे तर मॅनहॅटनमध्ये म्युलचा रसास्वाद घेण्यात आला. जगातील व्होडका घालून तयार करण्यात आलेले आणि आधुनिक जगात सर्वात लोकप्रिय ‘कॉकटेल’ म्हणून म्युलला श्रेय दिले जाते.

साहित्य

* पाच काकडीचे गोल काप  *  ४५ मिलिलिटर मधाचा रस *  ६० मिलिलिटर आंबा प्युरी *  ६० मिलिलिटर लिंबाचा रस  *  ६० मिलिलिटर जिंजर एल * बर्फ

कृती

* काकडीचे गोल काप आणि मधाचा रस कॉकटेल साखरेत मिश्रण करा

* या मिश्रणात आंबा प्युरी आणि लिंबाचा रस घालून बर्फासह दहा सेकंद जोराने ‘शेक’ करा.

* साखरेतील मिश्रण तांब्याच्या कपात गाळून घ्या.

* उरलेल्या जागेत ‘जिंजर एल’ भरून ढवळा.

First Published on February 14, 2018 2:57 am

Web Title: mango mocktail recipe