News Flash

बाजारात नवे काय?

टीव्हीएस स्कूटी पेप प्लस ही भारतातील पहिल्या क्रमांकाची परवडणारी स्कूटर असून यामध्ये ८७.८ सीसी, एअर-कूल्ड सिंगल सिलिंडर इकोथ्रस्ट इंजिन आहे.

‘केटीएम’कडून भारतात ७९० डय़ूक सादर

जगातील प्रथम क्रमांकाचा प्रीमियम मोटरसायकल ‘केटीएम’ने त्यांची बहुप्रतीक्षित ७९० डय़ूक बाजारात उतरवण्याची घोषणा मुंबईमध्ये केली. ही मध्यम वजनाची सुपरबाइक श्रेणीतील सर्वात आकर्षक आणि मजबूत मोटरसायकल आहे. प्रारंभिक किंमत ८,६३,९४५ (एक्स-शोरूम संपूर्ण भारतासाठी) आहे. आजपासून ९ शहरांमध्ये बुकिंगला प्रारंभ झाला आहे.

ही सुपरबाइक दिसायला स्पोर्टी आहे. कटिंग एज डिझाईन, अतिशय सुलभ हाताळणी आणि सवरेत्कृष्ट कार्य प्रदर्शनामुळे ती चालवणाऱ्याला प्रत्येक परिस्थितीत तिच्यावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होते. सुपरबाइक चालवण्याचा अद्भुत आनंद केटीएम ७९० डय़ूक देते.

९९ सीसी एल सी ८ सी इंजिन, ज्याचा केटीएममध्ये प्रथमच वापर करण्यात आला आहे. ते अतिशय हलक्या अशा फ्रेम्समध्ये बसवण्यात आल्यामुळे बाइकचे वजन कमी आहे. ७९० डय़ूकचे सर्वात खास वैशिष्टय़ म्हणजे ती रायडिंग प्रिसिजनची सर्वोच्च पातळी गाठण्याची हमी देते. वापरलेल्या यंत्रणेमुळे मोटारसायकलस्वाराला वाहन चालवताना आत्मविश्वास आणि नियंत्रणाची हमी मिळू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

टीव्हीएसची नवी स्कूटी पेप प्लस बाजारात

टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस स्कूटी पेप प्लस नुकतीच सादर केली आहे. या स्कूटरवरदेखील थ्रीडी एम्ब्लेम, नवीन ग्राफिक्स व उत्कृष्ट दर्जाची टेक्श्चर्ड सीट आहे. ज्यामुळे स्कूटरला अतिशय प्रभावी व आकर्षक रूप मिळाले आहे.

टीव्हीएस स्कूटी पेप प्लस ही भारतातील पहिल्या क्रमांकाची परवडणारी स्कूटर असून यामध्ये ८७.८ सीसी, एअर-कूल्ड सिंगल सिलिंडर इकोथ्रस्ट इंजिन आहे. ज्यामधून ४.९ पीएस पॉवर व ५.८ एनएम टॉर्क मिळतो. याच्या इकोथ्रस्ट इंजिनमुळे ग्राहकांना दीर्घकाळ, विनासायास, आरामदायी राइड्सचा आनंद घेता येतो. या श्रेणीतील इतर गाडय़ांच्या तुलनेत सर्वोत्तम ग्राऊंड रिचेबिलिटी आणि टेलिस्कोपिक सस्पेन्शन यामुळे ओबडधोबड रस्त्यांवरूनदेखील टीव्हीएस स्कूटी पेप प्लस अगदी आरामात चालवता येते, असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये मोबाइल चार्जर सॉकेट, साइड स्टॅन्ड अलार्म, अंडर सीट स्टोरेज हूक्स, डीआरएल, ओपन ग्लोव्ह बॉक्स व ज्यामुळे ही गाडी सेंटर स्टॅण्डवर उभी करण्यात कमी मेहनत लागते असे टीव्हीएसचे पेटेंडेड ‘इझी’ स्टॅन्ड तंत्रज्ञान ही खास वैशिष्टय़े आहेत. टीव्हीएस स्कूटी पेप प्लसची एक्स-शोरूम, दिल्ली किंमत ४३,२७७ रुपये असून सर्व ग्राहकांच्या आवडीनिवडी पूर्ण व्हाव्यात यासाठी यामध्ये सात आकर्षक रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.

अवान मोटर्सद्वारे दोन अत्याधुनिक ई वाहने

अवान मोटर्सने अत्याधुनिक संकल्पनांवर आधारित  दोन नवीन ई वाहनांचे अनावरण नुकतेच केले. पहिले संकल्पना ई वाहन ७२ वॅट २२ एएच लिथियम आयन बॅटरीसह चालविले जाईल आणि प्रत्येक चार्जवर ८० ते २०० किलोमीटर प्रति तास अशी उत्कृष्ट श्रेणी प्रदान करेल. १२०० वॅट मोटर पॉवरसह, वाहनाचा कमाल वेग ६० किलोमीटर प्रति तास असेल. तर दुसरे ई वाहन ६० वॅट ३५ एएच लिथियम आयन बॅटरीसह सुसज्ज असेल. त्याला ५० ते ८० किलोमीटर वेग श्रेणी आणि ४५ किलोमीटर प्रति तास गती असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 5:52 am

Web Title: market in new akp 94
Next Stories
1 जलपरी
2 देवीस्थाने
3 ब्रेड बाऊल गार्लिक सूप
Just Now!
X