‘ईव्हर्व’ची इलेक्ट्रिक स्कूटर

जिप्सीला पर्याय म्हणून चर्चेत असणारी मारुती सुझुकीची एसयूव्ही जिम्नीचे ऑटो एक्सपो-२०२० मध्ये पदार्पण झाल्याने भारतीय बाजारपेठेतील महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा या गाडय़ांना चांगलीच टक्कर मिळणार आहे. ही एसयूव्ही आपल्या ऑफरोडिंग कॅपेबिलिटी आणि बॉक्सिंग बॉडी स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने सध्या याची प्रदर्शनाची तारीख आणि किमतीबाबत कोणतीही घोषणा केली नाही.  लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या गाडीच्या भारतीय व्हर्जनमध्ये ५ दरवाजांसह इतर मोठे बदल पाहण्यास मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या गाडीमध्ये अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीला लक्षात ठेवून डिझाइन केलेले मोठे बंपर दिले आहे. क्लीअर आणि वाइड व्ह्यूसाठी एसयूव्हीमध्ये मोठ-मोठय़ा विंडो देण्यात आल्या आहेत. भारतात या गाडीचे सेकंड जनरेशन मॉडेल लॉन्च केले जाऊ  शकते. ज्यामध्ये जिप्सीसारखेच व्हीलबेस मिळेल. याची किंमत अंदाजे १० लाख रुपये असू शकते.

पुण्यातील ईव्हर्व वेहिकल मॉडिफिकेशन या कंपनीने आपली पहिली अत्याधुनिक प्रोटोटाइप मॉडल ईएफ-१ ऑटो एक्सपो-२०२० मध्ये सादर करून तरुणाईला खुणावले आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये एंट्री करत लग्जरी लूक असणाऱ्या या स्कूटरला वर्षांच्या अखेरीस लॉन्च करण्यात येणार असे सांगितले आहे. त्याच वेळी या स्कूटरची किंमत कळणार आहे.

या स्कूटरमध्ये दोन रिमूव्हेबल बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही बॅटरी बाहेर काढून चार्ज करता येतील. फास्ट चार्जद्वारे एका तासात आणि रेग्युलर चार्जने ५ तासांत ही बॅटरी चार्ज होते. ही स्कूटर फुल चार्जमध्ये १०० किलोमीटपर्यंत धावू शकते. तर यात ११० किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड देण्यात आला आहे.

स्कूटरमध्ये ४ ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहे. यामध्ये एम-१, एम-२, टबरे बूस्ट आणि एस चा समावेश आहे. कंपनी स्कूटरच्या नवीन व्हेरिएंटमध्ये डिजिटल कन्सोल लावणार आहे. ज्यात एनएफसी आणि ब्लू-टूथ कनेक्टिव्हिटीसोबत जीपीएस नेव्हिगेशन दिले जाणार आहे.