|| ज्योती चौधरी-मलिक

साहित्य  – २ वाटय़ा गव्हाचे पीठ, २५० ग्रॅम मेथीची भाजी, जिरे, वाटीभर बेसन, चमचाभर रवा, अर्धी वाटी दही, मीठ चवीप्रमाणे, अर्धा चमचा हळद, १ चमचा मिरची पावडर, १ चमचा चाट मसाला, तळण्यासाठी तेल.

कृती मेथीची जुडी निवडून घ्या. मेथीची पाने नीट धुऊन बारीक चिरून घ्या. आता गव्हाचे पीठ, बेसन एकत्र करा. त्यात दही, जिरे, चमचाभर तेल आणि सगळे मसाले घाला. यातच चिरलेली मेथी घालून पीठ घट्ट मळून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात पुऱ्या तळून घ्या. पुऱ्या खरपूस, सोनेरी रंगावर तळाव्या. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस, लोणचे कशाहीबरोबर खाता येतील.