02 July 2020

News Flash

एमजीची ‘हेक्टर प्लस’

एमजी मोटर इंडियाने ऑटो एक्स्पो २०२० मध्ये आपल्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांची विशाल श्रेणी प्रदर्शित केली.

बाजारात नवे काय? : डेस्टिनी १२५  बाजारात

हीरो मोटोकॉर्पने बाजारात सरस ठरलेली आपली स्प्लेंडर प्लस ही दुचाकी बीएस-६ इंजिनासह बाजारात आणली आहे. याचबरोबर कंपनीने डेस्टिनी १२५ आणि माइस्ट्रो ऐज १२५ या दोन स्कूटर्स बीएस-६ च्या मापदंडानुसार तयार केल्या आहेत. पर्यावरण स्नेही असणारे बीएस-६ हे इंजिन स्प्लेंडर आयस्मार्ट, एचएफ डिलक्स दुचाकी सोबत प्लेजर प्लस स्कूटरला सुद्धा देण्यात आले आहे. हीरो स्प्लेंडर+ बीएस-६ ची एक्सशोरूम किंमत ५९,६०० रुपये आहेत तर हीरो डेस्टिनी १२५ बीएस-६ ची एक्सशोरूम किंमत ६४,३१० रुपये आणि हीरो माइस्ट्रो ऐज १२५ बीएस-६ची कीमत ६७,९५० रुपये ठेवण्यात आली आहे.

एमजी मोटर इंडियाने ऑटो एक्स्पो २०२० मध्ये आपल्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांची विशाल श्रेणी प्रदर्शित केली. यामध्ये हेक्टर ब्रँडमधील नवीन ६ आणि ७ सीटर व्हॅरियण्ट ‘हेक्टर प्लस’चादेखील समावेश आहे. या वर्षांत विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या हेक्टर प्लसमध्ये आणखी सुधारित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे. यात नवीन हेडलॅम्प्स, फ्रंट ग्रिल, फ्रंट/रियर बंपर्स, रियर टेललाइट डिझाइन आणि सुधारित स्किड फ्रंट/ रियर प्लेट्स आहेत. यातून हेक्टर प्लस अधिक प्रशस्त आणि आरामदायक कार अनुभवासह एकत्र प्रवास करण्याचा अनुभव देईल, असा कंपनीचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 12:06 am

Web Title: mg hector plus destiny 125 on the market akp 94
Next Stories
1 वाहनांचे इंधन
2 सातारी वांगी
3 घारापुरीचा ‘सदाशिव’
Just Now!
X