News Flash

घरातल्या घरात : ‘मोझॉक सीडी’ आरसा

सीडींचा वापर तुम्ही तुमच्या बाथरूम मिररचे सौंदर्य खुलवण्यासाठी करू शकता.

पेन ड्राइव्ह आणि ऑनलाइन स्ट्रिमिंगच्या जमान्यात सीडी प्लेअरचं अस्तित्व जवळपास संपुष्टात आलेलं आहे. तरीही आपल्याकडे पूर्वी खरेदी केलेल्या अनेक सीडींचा संग्रह पडून असतो. यातील अनेक सीडी तर एका जागी धूळ खात पडल्याने खराब होऊन जातात. या सीडींचा वापर तुम्ही तुमच्या बाथरूम मिररचे सौंदर्य खुलवण्यासाठी करू शकता.

साहित्य

* जुन्या सीडी,

*  फेव्हिकॉल,

* कात्री ल्ल गरम पाणी

कृती

सर्वप्रथम एका भांडय़ात पाणी उकळा आणि गॅस बंद करून त्यात तुमच्या सात ते आठ सीडी बुडवून ठेवा. साधारण पाचेक मिनिटांनी या सीडी नरम पडतील. त्या मऊ होताच कात्रीच्या मदतीने त्यांना हव्या त्या आकारात कापा. तुम्ही केवळ हातांनीही या सीडी तोडू शकता. मात्र, हे करताना हाताला इजा होणार नाही, याची काळजी घ्या. सीडीचे कापलेले तुकडे बाथरूममधील आरशाच्या भोवती हव्या त्या पद्धतीने चिटकवून या तुकडय़ांच्या मदतीने आरशाभोवती चौकट (फ्रेम) तयार करा. सीडीचा चकचकीत भाग वरच्या बाजूला असेल, याची दक्षता घ्या. अशा प्रकारे तुमच्या आरशाभोवती सीडींच्या तुकडय़ांचा एक आकर्षक कोलाज तयार होईल. त्यावरील चकचकीत पृष्ठभागामुळे आरशावरचा प्रकाशही चांगला परावर्तित होतो.

(सौजन्य : https://diycozyhome.com/)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 3:53 am

Web Title: mojack cd mirror zws 70
Next Stories
1 शहर शेती : सुंदर- मनमोहक गुलाब
2 बायोडेटा मोबाइलवर
3 आपले रक्त लाल-तांबडेच का?
Just Now!
X