नीलेश लिमये

साहित्य

१ वाटीभर (२०० ग्रॅम्स)आंब्याचा रस, अर्धी वाटी नारळाच्या दुधाची पूड, कँडीचा साचा आणि आइस्क्रीमच्या कांडय़ा

कृती

नारळाच्या दुधाची पावडर थोडय़ाशा गरम पाण्यात मिसळा आणि त्याचे घट्टसर मिश्रण बनवा. आंब्याचा रस आणि हे नारळाचे दूध एकत्र फेटून घ्या. आता कँडीच्या साच्यात हे मिश्रण भरा. त्याच्यात आइस्क्रीमची कांडी खोचा आणि ३-४ तास फ्रिजरमध्ये ठेवा. आंबा आणि नारळाच्या दुधाच्या चवीची कँडी मस्तच लागते. आंब्याऐवजी तुम्ही सीताफळ, केळी, खरबूज यांपासूनही अशीच कँडी बनवू शकता.