साहित्य

दोन वाटय़ा मूगडाळ, पाव वाटी तांदुळाचे पीठ, आवडीनुसार हिरवी मिरची बारीक चिरून, छोटा आल्याचा तुकडा चिरून, ४ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा बारीक चिरून, थोडी कोथिंबीर चिरून, मीठ, ४ काळीमिरी दाणे, पाव चमचा जिरे भाजून घेणे, तेल तळणीसाठी.

कृती

दोन वाटय़ा मूगडाळ साधारण ४-५ तास भिजवून ठेवावी. त्यातली अर्धी वाटी डाळ बाजूला काढून घ्या. उरलेली डाळ मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या. आता त्यात सर्व जिन्नस एकजीव करून घ्या. बाजूला काढलेली मूगडाळही आता यात एकत्र करा. गरम तेलात वडे छान तळून घ्या. या वडय़ांबरोबर खायला कोथिंबीर, ओला नारळ, आलं, मिरची, लिंबुरस, मीठ हे सगळे जिन्नस घातलेली मस्त चटणी करून घ्या.