पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाच वापर करून म्हणजे, ‘नमो’ नावाने विद्यार्थ्यांसाठी ‘मिनी टॅब’ देण्यासाठीची एक योजना समाजमाध्यमांवर सध्या फिरत आहे. ‘न्यू अव्हेन्यूज ऑफ मॉडर्न एज्युकेशन थ्रू टॅबलेटस्’ म्हणजेच ‘नमो’ असे या योजनेचे नाव आहे. यात इच्छुकांनी स्वत:चे नाव आणि राज्य त्यावर नोंदवण्यास सांगितले जात आहे. मोदींच्या नावे ‘टॅब’ फुकटात मिळणार असल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

परंतु प्रत्यक्षात जेव्हा एखाद्याने स्वत:चे नाव आणि राज्य योजनेच्या संकेतस्थळावर नमूद केल्यास अन्य १५ मित्रांना आमंत्रित करण्याची सूचना येते. नंतर ‘गेट मिनी टॅब’वर ‘क्लिक’ केल्यास आमंत्रित केलेले आठ मित्र ‘लेफ्ट’ झाल्याची सूचना येते. त्यामुळे मित्रांना आमंत्रित करण्याची प्रक्रिया चालूच राहते आणि ही एक फसवणूक असल्याचे शेवटी उघड होते.