25 May 2020

News Flash

‘नॅनो’ एसयूव्ही!

वाहन उद्योगातील खरेदीदारांचा निरुत्साह पाहता देशातील आघाडीच्या मारुती सुझुकी कंपनीकडून खरेदीदारांचा उठाव मिळावा म्हाणून विविध प्रयत्न सुरू आहेत.

मारुतीची एस-प्रेसो, रेनो क्विडची फेसलिफ्ट पाच लाखांत

वाहन उद्योगात मंदी असली तरी नवीन कार बाजारात येण्याचे काही कमी झाले नाही. गेल्या आठवडाभरात दोन कार बाजारात आल्या आहेत. त्याची विशेष नोंद घ्यावीशी वाटते. एक मारुती सुझुकीची एस-प्रेसो आणि रेनो इंडियाच्या क्विडची सुधारित आवृत्ती फेसलिफ्ट. या दोन्ही कार पाच लाखांच्या आतील असून त्या खरेदीदारांचा बदलता पसंतीक्रम पाहून बनविल्या असल्याचे दिसते. या दोन्ही कारला येत्या काळात बाजारात खरेदीदारांची चांगली पसंती मिळेल असा कंपनीला विश्वास आहे.

पाश्चिमात्य देशांमध्ये विशेष लोकप्रिय असलेला स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल किंवा एसयूव्ही हा वाहनप्रकार सध्या भारतात लोकप्रिय ठरत आहे. गेल्या वर्षभरात एसयूव्ही प्रकारातील वाहनांना खरेदीदारांनी पसंती दिली आहे. त्यातही अनेक कॉम्पॅक्ट एसयूव्ही रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. म्हणजे १२०० सीसीपेक्षा कमी इंजिनक्षमता आणि चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही. ही श्रेणी सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक लोकप्रिय आणि अटीतटीची स्पर्धा असलेली आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, ह्य़ुंदाय आणि निसानसारख्या प्रमुख भारतीय कंपन्यांसह एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर आणि किआ मोटर्ससारख्या परदेशी कंपन्यांनी या विविध आकारांतील व किमतीतील एसयूव्ही सादर केल्या आहेत.

वाहन उद्योगातील खरेदीदारांचा निरुत्साह पाहता देशातील आघाडीच्या मारुती सुझुकी कंपनीकडून खरेदीदारांचा उठाव मिळावा म्हाणून विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी दसरा दिवाळी सणांसाठी सवलती देत आपल्या वाहनांच्या किमतीही कमी केल्या आहेत. यावर न थांबता कंपनी नवीन कारही बाजारात आणत आहे. त्यांनी ३० स्पटेंबर रोजी बहुप्रतीक्षित एस-प्रेसा ही बाजारात दाखल केली. ही कार पहिली छोटी एसयूव्ही असल्याचा दावाही कंपनीने केला असून तिची किंमतही सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी अशी सुरुवातीची किंमत ३.६९ लाख इतकी असून एसयूव्ही वाहन प्रकारातील बहुतांश सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ही कार एसयूव्ही प्रकारातील नाही, मात्र तिला एसयूव्हीसारखी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने एस-प्रेसोची कन्सेप्ट सन २०१८ च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती फ्यूचर-ए नावाने सादर केली गेली होती. समोरून बोल्ड दिसते. फ्रंट आणि रियर बंपर मजबूत आणि भव्य आहे. कारचे ग्राउंड क्लीअरन्सदेखील अधिक आहे. याबरोबरच ही कार वजनाने हलकीदेखील असणार आहे. या कारला एसयूव्ही कारचा लुक देण्याचा पुरेपूर प्रयत्न कंपनीने केला असून पाहताक्षणी प्रेमात पडाल अशी कार बनविण्यात आली आहे. केबिन काळ्या रंगात आहे. टॉप व्हेरियंटमध्ये यात ऑरेंज हायलाइट्स मिळणार आहेत. डॅशबोर्डची डिझाइन फ्यूचर-एस कॉन्सेप्टसारखी आहे.  डॅशबोर्डच्या मध्यभागी डिजिटल स्पीडोमीटर आणि टेकोमीटर देण्यात आला आहे. याच्याच खालच्या बाजूला मारुतीचे स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलेली  आहे.  स्पीडोमीटर कंसोल आणि टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम एका सक्र्युलर आउटलाइनच्या आत आहे. त्याचा लुक मिनी कूपर कारसारखा आहे. सेंट्रल एसी वेंट्स सक्र्युलर हे आउटलाइनच्या दोन्ही बाजूंना देण्यात आले आहे.  भारतात एसयूव्ही कारला मागणी पाहता ही छोटय़ा आकारातील एसयूव्हीसारखी दिसणारी व सर्वसामान्य खरेदीदारांना पराडणारी कार मारुतीने बाजारात आणली असून खरेदीदार तिला कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.

रेनोची ‘फेसलिफ्ट’

रेनो इंडियाने क्विडची सुधारित आवृत्ती फेसलिफ्ट नुकतीच बाजारात आणली असून तिला कंपनीने एसयूव्ही लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या कारपेक्षा अधिक आकर्षक आणि दमदार बनविण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीची किंमत २.८३ लाखांपासून ४.८५ लाखांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. पाच प्रकारांत ही कार उपलब्ध असून अगोदरच्या गाडीत डिझाइन आणि सुविधांत अनेक बदल करण्यात आले आहेत. स्प्लिट हेडलॅँप, डे-टाइम रनिंग एलईडी लाइट दिल्या आहेत. ग्राउंड क्लीअरन्स ४ मीटरने वाढवत १८४ मिलीमीटर करण्यात आला आहे. ८.० इंचांचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम दिले असून ते एंड्रॉयड ऑटो आणि एपल कार प्लेला कनेक्ट करता येईल. चालकासाठी एअरबॅग ही सर्व प्रकारांत असून आरएक्सटी और क्लाइम्बर प्रकारात प्रवाशांसाठीही एअरबॅग दिल्या आहेत.  इंजनमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. ०.८ लिटर  व १.० लिटर पेट्रोल इंजन असून बीएस ६ मध्ये अद्याप बदल केलेला नाही. ०.८ लिटर इंजिन ५४ एचपी इतकी शक्तिशाली असून ते ७२  एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. तर १.० लिटर   इंजिन ६८ एचपी इतकी शक्तिशाली असून ते ९१  एनएम टॉर्क जनरेट करणार आहे.  कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे.

किंमत

स्टँडर्ड : ३.६९  लाख

स्टॅँडर्ड ओटीपी : ३.७५  लाख

एलएक्सआय : ४.०५ लाख

एलएक्सआय ओटीपी  : ४.११ लाख

व्हीएक्सआय : ४.२४ लाख

व्हीएक्सआय ओटीपी : ४.०३ लाख

व्हीएक्सआय प्लस : ४.४८ लाख

व्हीएक्सआय एटी : ४.६७ लाख

व्हीएक्सआय प्लस एटी : ४.९४  लाख

बूट स्पेस २७० लिटर

कारची लांबी ३५६५ मि.मी, रुंदी १५२० मि.मी  तर उंची १५४९-१५६४ मि.मी असून ती विविध प्रकारांत उपलब्ध आहे. ग्राउंड क्लीअरन्सदेखील १८० मि.मी असून बूट स्पेस २७० लिटरची दिली आहे.

सुरक्षा सुविधा

एबीएस, स्पीड वॉर्निग सिस्टम आणि रियर पार्किंग सेन्सर्ससारखे फीचर्स स्टँडर्ड म्हणजेच सर्व व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहेत. टॉप व्हेरियंट्समध्ये डय़ुअर फट्र एअरबॅग्स, तर बेसिक व्हेरियंट्समध्ये केवळ एक म्हणजेच ड्रायव्हरच्या बाजूकडे एअरबॅग मिळणार आहेत.  १० पेक्षा अधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आल्या आहेत.

इंजिन

मारुती एस-प्रेसोमध्ये ९९८ सीसीचे १.० लिटरचे बीएस ६ पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन ६८ एचपी इतकी शक्तिशाली असून ते ९० एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. टॉप व्हेरियंटमध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्यायदेखील आहे. प्रतिलिटर २१ किलोमीटपर्यंत अ‍ॅव्हरेज देईल असा कंपनीने दावा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2019 3:53 am

Web Title: nano car maruti akp 94
Next Stories
1 बाजारात नवे काय?
2 वेगाचे वादळ
3 परीकथेतील मिठाचे गाव हॉलस्टॅट
Just Now!
X