‘प्रिंटर’ निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कॅनन कंपनीने ‘पिक्समा जी३०१०’ आणि ‘पिक्समा जी२०१०’ हे दोन नवीन प्रिंटर भारतात सादर केले आहे. वायरलेस सुविधा, बदलता येणारा इन्क टँक, प्रिंट-स्कॅन-कॉपी सुविधा अशी या प्रिंटरची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. अधिक उत्पन्न, वापरण्यास सोपे आणि सुटसुटीत आकाराचे कॉम्पॅक्ट पिक्समा सिरीजचे प्रिंटर्स खास घरगुती किंवा छोटय़ा कार्यालयांसाठी तयार करण्यात आले आहेत. या प्रिंटरमध्ये थेट मोबाइलवरून प्रिंट काढण्याचीही सुविधा आहे.

किंमत: ‘जी३०१०’ – १३९९५ रुपये. ‘जी२०१०’ – ११०५५ रुपये.

Vodafone Idea (VIL) , FPO, public investors
‘व्होडा-आयडिया’ची सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटींची निधी उभारणी, आजपासून प्रत्येकी १०-११ रुपयांनी समभाग विक्री
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
ED
‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; पुण्यात ‘ईडी’ची कारवाई; संचालक दुबईत पसार
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

 

‘झिऑक्स’चे नवे परवडणारे फोन

झिऑक्स मोबाइल्स या ग्राहकांना परवडणारे तंत्रज्ञान व दर्जेदार उत्पादने देणाऱ्या मोबाइल्स विभागामधील जलदगतीने विकसित होत असलेल्या ब्रॅण्डने आपला फीचर फोन्स विभाग अधिक प्रबळ केला आहे. या ब्रॅण्डने नवीन ‘7’ व ‘3’ फीचर फोन्स सादर केले आहेत.  १.८ इंची प्रखर डिस्प्ले असलेले दोन्ही फोनवरील दृश्य कोणत्याही बाजूने परिपूर्ण दिसते. या फोनमध्ये फ्लॅश असलेला रिअर कॅमेरा आहे. हा कॅमेरा अंधुक प्रकाशातदेखील सुस्पष्ट इमेजेस् कॅप्चर करतो. दोन्ही डिवाइसेसमध्ये ड्युअल सिमची सुविधा आहे. या फोन्समध्ये ऑटो कॉल रेकॉìडगचे वैशिष्टय़ आहे.

किंमत : ८७५-८९९ रुपये.

 

‘अ‍ॅस्ट्रम’चा वायरलेस चार्जर

‘अ‍ॅस्ट्रम’ या भारतातील नावीन्यपूर्ण व सर्वोत्तम सोल्यूशन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या आयटी पेरिफेरल्स उत्पादक व आघाडीच्या ‘नवीन तंत्रज्ञान’ ब्रॅण्डने पहिले वायरलेस चाìजग डिवाइस ‘ढअऊ उह300’ सादर केले आहे. या वायरलेस चाìजग डिवाइसमध्ये जलद व कार्यक्षम चाìजगसाठी क्यूआय व्हर्जन आहे. हा चार्जर अ‍ॅपल व सॅमसंगसारख्या ‘क्यूआय-सक्षम’ स्मार्टफोन्स व डिवाइसेसशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतो. हा चार्जर विनावायर अँड्रॉइड फोनना १५ वॉटपर्यंत आणि आयफोनना ७.५ वॉटपर्यंतच्या पॉवर आऊटपुटसह चार्ज करतो.

किंमत : ३४९९ रुपये   

 

सोनीचा कार ऑडिओ

सोनी इंडियाने नुकतीच नवीन इन-कार एव्ही रिसिव्हर ‘अश्-अ5000’ भारतात सादर केली आहे. १७.६ सेंमीचा कॅपॅसिटीव्ही टचस्क्रीन, स्मार्टफोन इंटिग्रिटी, उत्तम आवाज अशी या यंत्रणेची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. ही यंत्रणा ‘अँड्रॉइड ऑटो’सोबत जोडल्यास वापरकर्त्यांना संगीतासोबत ‘नेव्हिगेशन’चा आनंद घेता येतो.  त्यामुळे उपयोगकर्त्यांना व्हीलवरून हात न काढतासुद्धा ‘रिअल टाइम’ मार्ग दिसू शकतो. यात दिशा, संगीत आणि संदेश आणि अशा अनेक बाबतींतील महत्त्वपूर्ण माहिती आपोआप साध्या कार्ड्समध्ये नियोजित केली जाते आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा ती दिसते. नवीन एव्ही रिसिव्हरच्या ‘क्विक वेकअप’ डिझाइनमध्ये सध्याच्या उत्पादनांच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्हेशनमध्ये दुप्पट वेग आहे. इग्निशन सुरू केल्या केल्या तेसुद्धा लगेच सुरू होते.

किंमत : २४९९० रुपये