ह्य़ुंदाई मोटर इंडिया लिमिटेड या भारतातील स्मार्ट मोबिलिटीला प्राधान्य देणाऱ्या कंपनीने आपली केट्रा ही एसयूव्ही आता आणखी सुधारणा करीत बाजारात उतरवली आहे. फर्स्ट जनरेशन क्रेटाच्या यशावर आणखी मजला चढवून तयार करण्यात आलेली सेकंड जनरेशन कार असल्याचा कंपनीचा दावा असून काळाच्या पुढील रचना, शक्तिशाली कामगिरी आणि आरामदायी व सोयीस्कर सुविधा देण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

ऑल न्यू क्रेटा ‘सेन्स्युअस स्पोर्टीनेस’ या ह्य़ुंदाईच्या ग्लोबल डिझाइन तत्त्वज्ञानाशी सुसंगत अशी घडवण्यात आली असून शहरी आणि तंत्रज्ञानावर निष्ठा असलेल्या तसेच प्रयोगशील तरीही उत्कट पिढीला डोळ्यापुढे ठेवून डिझाइन करण्यात आली आहे.

ब्ल्यूलिंकसह २६.०३ सेंटीमीटरच्या चालक केंद्रित सेंट्रिक एचडी इन्फोटेनमेंटचा समावेश असून यात नेव्हिगेशन अंगभूत असून, तंत्रज्ञान व अव्वल रचनेचा अखंडित मेळ साधण्यास उपयुक्त मोबाइल अ‍ॅप्सचाही समावेश होतो. ५०हून अधिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह अद्ययावत ब्ल्यूलिंकने युक्त आहे. इन-कार कनेक्टिव्हिटीला वाढीव सोय व आरामासह या गाडीने नवीन आयाम दिला आहे. ग्राहक आता केवळ ‘हॅलो ब्ल्यू लिंक’ असे उच्चारून उच्च दर्जाच्या आवाजाचा अनुभव घेऊ  शकतात, तसेच सनरूफ ओपन/क्लोज, सीट व्हेंटिलेशन कंट्रोल, हवामान- नियंत्रण- तापमान, पंख्याचा वेग, वाऱ्याची दिशा आणि एअर-इंटेक प्रकारचे नियंत्रण (ताजी/खेळती) अशा अनेक महत्त्वाच्या सुविधा नियंत्रित करू शकतात. प्रगत ब्ल्यूलिंक कनेक्टिव्हिटीमुळे एटी आणि एमटीसाठी इंजिन दुरून स्टार्ट करण्याची मुभा मिळते. अशा प्रकारची पहिलीच सुविधा आहे.

ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकपासून ते पेडल शिफ्टर्सपासून अनेकविध स्मार्ट तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज आहे. या सुविधा दमदार तसेच गमतीशीर ड्रायव्हिंगचा अनुभव देतात.

सुधारित सुविधा

’ टॉप व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्ज

’ इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण

’ वाहन स्थिरता व्यवस्थापन

’ हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल

’ रीअर डिस्क ब्रेक्स

’ स्टीअरिंग अडाप्टिव्ह पार्किंग गाइडलाइन्ससह रीअर कॅमेरा

’ आयएसओएफआयएक्स चोरीचा इशारा (बर्गलर अलार्म)