13 July 2020

News Flash

भारतातील नवी पर्यटनस्थळे

भारत हा निसर्गसंपदेत प्रचंड वैविध्य असलेला देश आहे.

भारत हा निसर्गसंपदेत प्रचंड वैविध्य असलेला देश आहे. उत्तरेकडे हिमालयाच्या रांगा, उरलेल्या तिन्ही बाजूंना विशाल समुद्र, पूर्व-ईशान्य प्रदेशातील हरितसमृद्ध डोंगररांगा असे वैविध्य असलेल्या या देशातील सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, वन्यजीव सौंदर्यस्थळांची अजिबात उणीव जाणवत नाही. त्यामुळे जगभरातील पर्यटक या देशाकडे आकर्षित होत असतात. याच सौंदर्यात भर टाकणारी काही नवी पर्यटनस्थळे आता पर्यटकांचे आकर्षण केंद्रे ठरत आहेत. अशा महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा थोडक्यात आढावा.. भारत हा निसर्गसंपदेत प्रचंड वैविध्य असलेला देश आहे. उत्तरेकडे हिमालयाच्या रांगा, उरलेल्या तिन्ही बाजूंना विशाल समुद्र, पूर्व-ईशान्य प्रदेशातील हरितसमृद्ध डोंगररांगा असे वैविध्य असलेल्या या देशातील सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, वन्यजीव सौंदर्यस्थळांची अजिबात उणीव जाणवत नाही. त्यामुळे जगभरातील पर्यटक या देशाकडे आकर्षित होत असतात. याच सौंदर्यात भर टाकणारी काही नवी पर्यटनस्थळे आता पर्यटकांचे आकर्षण केंद्रे ठरत आहेत. अशा महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा थोडक्यात आढावा..

दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालय

दिल्लीत मादाम तुसाँ संग्रहालय आहे, जेथे ५० पेक्षा जास्त मान्यवर व्यक्तींचे अगदी जिवंत वाटणारे पुतळे आहेत. हे संग्रहालय डिसेंबर २०१७ मध्ये सुरू झाले आणि त्याने लोकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या, पुढाऱ्यांच्या आणि क्रीडापटूच्या अगदी जवळ जाण्याची संधी मिळवून दिली. या संग्रहालयात अमिताभ बच्चन,

राज कपूर, हृतिक रोशन, माधुरी दीक्षित, सलमान खान, शाहरुख खान, मर्लिन मनरो, टॉम क्रूझ, निकोल किडमन, सचिन तेंडुलकर, लिओनेल मेस्सी, महात्मा गांधी, नरेंद्र मोदी आणि इतर अनेक व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत.

कावेरी रिव्हर गॅलरी

म्हैसूर या दक्षिण भारतातील प्रसिद्ध शहरात लवकरच कावेरी रिव्हर गॅलरी असेल आणि कर्नाटक राज्यातील ते एक मोठे पर्यटन स्थळ असेल. ही गॅलरी कावेरी नदीला समर्पित असून त्यात नदीचे जीवन, तिच्यातील जैव विविधता आणि कर्नाटक व इतर राज्यांतील लोकांसाठी असलेले तिचे महत्त्व यांचे चित्रण पाहता येईल. नदीचे पर्यावरण आणि भूस्तरशास्त्रीय पैलू दाखवणारा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेही या गॅलरीत दिसेल. राष्ट्रीय विज्ञान अकादमी आणि कर्नाटक पर्यटन विभागाच्या सहयोगाने ही गॅलरी बांधण्यात येईल.

‘स्टॅचू ऑफ युनिटी’

गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठय़ा पुतळ्याचे अनावरण करून भारताचे अलीकडेच एक विक्रम नोंदवला आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी अनावरण करण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा ६०० फूट उंचीचा पुतळा अमेरिकेच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षा चौपट उंच आहे. नर्मदा नदीतील एका बेटावर उभारण्यात आलेला हा पुतळा आणि त्याभोवतालचा परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

जटायू नेचर पार्क

या सुंदर अशा मानवनिर्मित संरचनेचे उद्घाटन केरळच्या कोलम जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात आले. ही जागा आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. हे उद्यान ६५ एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेले असून असे म्हणतात की, ही संरचना अशा जागी उभी उभारण्यात आली आहे, जेथे जटायू या पौराणिक पक्ष्याने शेवटचा श्वास घेतला होता. येथे पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. येथे ६डी थिएटर, एक डिजिटल संग्रहालय व अशा अनेक गोष्टी आहेत. या उद्यानाने अलीकडेच केबल कार सुविधा सुरू केली आहे, जी या प्रकारची दक्षिण भारतातील पहिलीच केबल कार आहे.

घोडाझरी अभयारण्य

महाराष्ट्र राज्याने त्यांच्या राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या यादीत आणखी एक अभयारण्य दाखल केले आहे. हे नवीन घोडाझरी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात असून १५९ वर्ग किमी क्षेत्रात ते विस्तारलेले आहे. वाघ हे येथील मुख्य आकर्षण असेल, पण इतर वन्य पशूदेखील येथे दिसू शकतील. या नवीन अभयारण्यात अद्भुत सफारीचा आनंद घेता येईल.

(‘क्लिअरट्रिप’ या संकेतस्थळाने संकलित केलेली माहिती)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2019 3:16 am

Web Title: new tourist destinations in india akp 94
Next Stories
1 अरिसी उपमा
2 ‘डीजी लॉकर’ची उपयुक्तता
3 रसायनशास्त्र आणि सौंदर्यप्रसाधने
Just Now!
X