बाजारात नवे काय?
भारतातील एंड टू एंड इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता नेक्सझू मोबिलिटीने उत्पादन विस्ताराच्या योजनेअंतर्गत ‘ई सायकल’ निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला असून रोडलार्क, अॅलो आणि रोम्पस या तीन नव्या ई सायकल सादर केल्या आहेत. या ई सायकल्स लिथियम आयर्न बॅटरीजनी सुसज्ज असून त्यांचे सरासरी आयुष्य ७५० चार्जेस एवढे आहे. या सहज सोप्या आणि पर्यावरणपूरक सायकल ३ ते ४ तासात चार्ज होतात.
या अत्याधुनिक ई सायकल अतुलनीय सहजतेसह उत्कृष्ट रायडिंगचा अनुभव देतात. तिन्ही सायकलमध्ये २६’’ नायलॉन टायर्स लावले असून सहज व सुरक्षित प्रवासासाठी ते मजबूत सस्पेंशन पुरवतात. बीएलडीसी २५० व्होल्ट, ३६ व्होल्टमोटरद्वारे ही सायकल पॅडलिक तसेच थ्रॉटल मोडमध्येही उत्तम मायलेज देते. टिकाऊ स्टील अलॉय फ्रेम आणि उच्च दर्जाचे फोम कुशन यामुळे ही वैयक्तिक तसेच व्यावसायिक वापरासाठी परिपूर्ण सायकल ठरते.
नेक्सझू मोबिलिटीचे व्यवसायप्रमुख पंकज तिवारी यांनी सांगितले की, भारतात ई सायकलची स्वाकारार्हता वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून पर्यावरणाला तसेच ग्राहकांच्या आरोग्यासाठीही हे लाभदायक ठरेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 12:09 am