शुभा प्रभू साटम

गणपतीच्या दिवसात मोदक तर हवेतच, पण अनेकांना मोदकाच्या उकडीचा आणि सारणाच्या प्रमाणाचा अंदाज येत नाही. मग कधी सारण उरते तर कधी उकड. सारण उरले तर ते नुसते खाता येते किंवा एखाद्या गोड पदार्थात घालूनही खाऊ शकतो पण उकडीचे काय करावे, हा प्रश्न पडतो. त्यासाठी फिरंगी ट्विस्ट देऊन केलेली एक झटपट पाककृती.

साहित्य-

तांदळाची उकड, पिझ्झा मसाला, हब्र्ज, चाट मसाला, चीझ किंवा ओवा, धने-जिरे पूड आणि मीठ.

कृती

नेहमीप्रमाणे उकड करून घ्या. तयार असेल तर प्रश्नच नाही. या उकडीच्या छोटय़ा छोटय़ा पुऱ्या करून घ्याव्यात. त्यावर सर्व मसाले आणि मीठ एकत्र करा आणि वाफवून घ्या. वेगळ्या चवीचे खाणे तयार.

जर गोड निवगऱ्या करायच्या असतील तर तिखट मसाल्यांच्या ऐवजी, मध, तूप अगदी चॉकलेट सॉससुद्धा घालून वाफवून घ्या. गोड निवगऱ्या करताना उकडीमध्ये जायफळ उगाळून घालता येईल. तसेच गूळ किंवा साखर वापरता येईल.