News Flash

टेस्टी टिफिन : पौष्टिक खांडवी

तांदुळाचा रवा, गूळमिश्रित पाण्यात एकत्र करून शिजवावा. शिजवताना त्यात अर्धा चमचा तूप आणि ओले खोबरे घालावे.

(संग्रहित छायाचित्र)

मीना साठय़े

साहित्य :

१ भांडे तांदुळाचा रवा, १ भांडे गूळ, १ वाटी खोवलेला नारळ, १ चमचा साजूक तूप, थोडी वेलची पूड, बदामाचे काप.

कृती

तांदुळाचा रवा, गूळमिश्रित पाण्यात एकत्र करून शिजवावा. शिजवताना त्यात अर्धा चमचा तूप आणि ओले खोबरे घालावे. तसेच वेलची पूडही घालावी. गोळा घट्ट झाल्यावर थाळीला तूप लावून त्यात हे मिश्रण थापावे. वरून थोडा ओला नारळ भुरभुरावा. आणि छान वडय़ा पाडाव्यात. सजावटीसाठी बदामाचे काप घालावेत. हा पदार्थ एकदम पौष्टिकही असतो आणि चवीलाही छान लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 12:14 am

Web Title: nutritious khandvi recipe
Next Stories
1 शहरशेती : अबोली, कोऱ्हांटी
2 कलाकारी : पुठ्ठय़ाचं खेळघर
3 अभ्यासाचे अ‍ॅपसोबती!
Just Now!
X