21 July 2019

News Flash

टेस्टी टिफिन : ओट्स कटलेट

बटाटा, मटर, राजमा, सोया,पनीर, फ्लॉवर किंवा चिकन यातल्या कोणत्याही पदार्थासोबत ओट्सचा छान मेळ बसू शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

शुभा प्रभू साटम

बटाटा, मटर, राजमा, सोया,पनीर, फ्लॉवर किंवा चिकन यातल्या कोणत्याही पदार्थासोबत ओट्सचा छान मेळ बसू शकतो. त्यामुळे यातल्या तुम्हाला आवडणाऱ्या पदार्थासोबत ओट्स कटलेट नक्की करून पाहा.

साहित्य :

* ओट्स

* आले-लसूण वाटलेले

* मिरची

*  कोथिंबीर

*  गरम मसाला

* आमचूर किंवा लिंबू रस

* मीठ आणि वर म्हटल्यापैकी कोणतीही एक भाजी किंवा कडधान्य किंवा चिकन.

कृती

किंचित भाजलेले ओट्स भिजवून घ्या, नंतर त्यातील पाणी काढून पिळून घ्या. ओट्ससोबत कटलेटसाठी बटाटा वा फ्लॉवरसारखी भाजी घेणार असाल तर ती नीट धुऊन चिरून उकडून घ्या. चिकन घेणार असाल तर तेही नीट स्वच्छ करून वाफवून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. राजमा किंवा कोणते कडधान्य घेणार असाल तर ते नीट भिजवून मग उकडूनच घ्या. आले-लसूण-मिरची, लिंबू किंवा आमचूर, कोथिंबीर, गरम मसाला, मीठ, ओट्स आणि बाकीचे मिश्रण एकत्र मळून घ्या. त्याचे छोटे गोळे करा आणि ब्रेडच्या चुऱ्यात किंवा आवडीच्या पिठात घोळून तळून घ्या.

First Published on July 12, 2019 1:29 am

Web Title: oats cutlet recipe abn 97