‘पेबल’चे वायरलेस चार्जिग पॅड

तंत्रज्ञान क्षेत्रातील उपकरणे तयार करणाऱ्या ‘पेबल’ या बॅ्रण्डने ‘सेन्स’ नावाचा वायरलेस चार्जिग पॅड बाजारात आणला आहे. वायरलेस अर्थात क्यूआय चार्जिगशी सुसंगत फोन ‘सेन्स’द्वारे चार्ज करता येतात. १० वॉट क्षमतेचा हा जलद चार्जिग पॅड अँड्रॉइड तसेच आयओएस वायरलेस चार्जिग उपकरणांना चार्ज करू शकतो. असे फोन या पॅडवर ठेवताच चार्जिग सुरू होते. पेबलच्या ‘सेन्स’मध्ये अतिरिक्त सुरक्षिततेसाठी विविध सुरक्षा वैशिष्टय़े आहेत. यामधील ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण आणि इनपुट ओव्हरव्होल्टेज प्रोटेक्शन वैशिष्टय़े चार्जिगदरम्यान स्मार्टफोन व इतर डिव्हाईसेसच्या सुरक्षिततेची खात्री देतात.

वायरलेस चार्जरची डिझाइन सडपातळ असून टेक्स्चर रबरी आहे. सॉफ्ट व स्मूथ नॉन-स्लिप पॅड तुमच्या डिवाईसला सुरक्षितपणे भक्कम ग्रिपची खात्री देतो.

किंमत : १८९९ रुपये

‘आयरोबोट’ला गूगल असिस्टंटचे पाठबळ

‘आयरोबोट’ या आघाडीच्या जागतिक रोबो व्हॅक्यूम ब्रँडचे अधिकृत वितरक प्योरसाइट सिस्टम्स प्रा. लि.ने आयरोबोट स्मार्ट क्लीनिंग रोबोंसाठी ‘गूगल असिस्टंट’चे पाठबळ जाहीर केले आहे. त्यामुळे ‘गूगल होम’कडून मिळणाऱ्या सूचनांचे ‘आयरोबोट’ची उत्पादने तंतोतंत पालन करतील. ‘गूगल होम’वरून सूचना देताच आयरोबोटचा ‘रूम्बा’ लगेच सफाई सुरू करेल. आयरोबोटच्या उत्पादनांना आधीपासूनच ‘अ‍ॅमेझॉन अलेक्सा’चे पाठबळ लाभले आहे.

इन्फिनिक्सचा ‘एस४’

‘इन्फिनिक्स’च्या कंपनीचा ‘एस४’ हा ३२ मेगापिक्सेलचा सेल्फि कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात आला आहे. यामध्ये १३+२+८ मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे मागील बाजूस पुरवण्यात आले आहेत. तीन जीबी रॅम, ३२ जीबी अंतर्गत मेमरी, २५६ जीबी स्टोअरेज वाढवण्याची सुविधा, ६.२१ इंचाची ड्रॉप नॉच स्क्रीन, अँड्रॉइड ९.०, ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी, २ गिगाहार्ट्झचा ऑक्टाकोअर प्रोसेसर अशी या स्मार्टफोनची वैशिष्टय़े आहेत.

किंमत : १० हजार रुपये

‘एलॉजिक’ची पॉवर बँक

‘एलॉजिक’ या कंपनीने अ‍ॅपल वॉच आणि आयफोनसाठी खास अशी पॉवर बँक बाजारात आणली आहे. ६७०० एमएएच क्षमतेची बॅटरी असलेली ही पॉवर बँक दिसायला अन्य पॉवर बँकच्या तुलनेत अतिशय वेगळी आहे. यात अ‍ॅपल वॉचच्या चार्जिगसाठी ‘मॅग्नेटिक चार्जिग’ची रचना करण्यात आली असून आयफोनच्या चार्जिगसाठी स्वतंत्र केबल पुरवण्यात आली आहे. याखेरीज कोणताही स्मार्टफोन किंवा यूएसबी चार्जिग उपकरण याद्वारे चार्जिग करता येते. विशेष म्हणजे अ‍ॅपलनेही आपल्या वॉच आणि आयफोनसाठी या पॉवर बँकला सक्षमतेचे प्रमाणपत्र दिले आहे. या पॉवर बँकद्वारे अ‍ॅपल वॉच सहा वेळा तर स्मार्टफोन दोन वेळा पूर्णपणे चार्ज करता येतो.