शुभा प्रभू-साटम

पालक अडई म्हणजे तामिळ पद्धतीचे घावन.

साहित्य – १ वाटी तांदूळ, अर्धी वाटी तूरडाळ, अर्धी वाटी चणाडाळ, थोडीशी उडीदडाळ, पालकाची पाने, मीठ, हिरवी मिरची, आले.

कृती –  पालक किंचित उकडून मग तो चिरून घ्यावा किंवा तो धुऊन कच्चाच वाटून घ्यावा. आले-मिरची वाटून घ्यावे. तांदूळ आणि डाळी निदान दोन तास भिजत घालून निथळवून वाटून घ्याव्यात. आता यामध्ये पालक, आलं-मिरची आणि मीठ घालून ते छान मिसळून घ्यावे. गरज पडल्यास पाणी घालून सरसरीत करावे. नेहमीप्रमाणे डोसे घालावेत. पण लक्षात ठेवा ही अडई कुरकुरीत नसते.