साहित्य – ३ कप भरून पपईचे तुकडे, २-३ चिकू. ड्रेसिंगकरता – २ चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा सैंधव मीठ, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, १ चमचा मध, काळीमिरी चवीनुसार

  • कृती : चिकू धुऊन त्याचे चौकोनी तुकडे करावेत. वाटीत ड्रेसिंगसाठीचे सर्व साहित्य म्हणजे लिंबू रस, मीठ, ऑलिव्ह ऑइल, मध आणि काळीमिरी असे एकत्र करावे. एका लहान पण आकर्षक वाडग्यामध्ये चिकू आणि पपईच्या फोडी एकत्र कराव्या. त्यावर ड्रेसिंग घालून मस्त चवीचवीने खावे. या सॅलडमध्ये तुम्हाला डाळिंब, केळी, लेटय़ुसची पाने असे काहीही वापरता येईल. दुधातील फ्रूटसॅलड खाण्यापेक्षा असे वेगळ्या चवीचे सॅलड खाल्ल्यास तोंडाला छान चवही येईल आणि डाएटही ताब्यात राहील.

पोषणमूल्ये

  • कॅलरी – ३५० ग्रॅम
  • प्रोटिन – ३ ग्रॅम
  • फॅट –   ६ ग्रॅम
  • कार्ब्स – ७५ ग्रॅम