|| अर्चना जोशी

पावसाळ्यात पायांची सफाई जरा जास्तच करावी लागते. ब्युटीपार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करण्यापेक्षा प्युमिक स्टोनने नियमितपणे तळवे घासणे सहज शक्य असते. बराच काळ वापरून या दगडाला भेगा पडल्यास त्याने पाय घासताना तो लागून इजा होऊ शकते. त्यामुळे भेगा पडल्यावर सामान्यपणे हा दगड फेकून दिला जातो. चला, आज त्याचा पुनर्वापर करूया.

साहित्य – प्युमिक स्टोन किंवा अन्य कोणताही गुळगुळीत दगड, रंग, ब्रश, रंगकामाचे साहित्य, वॉर्निश, पेन्सील इत्यादी.

कृती –

  • प्युमिक स्टोनवर पेन्सिलने हवे ते सोपे चित्र रेखाटा.
  • चित्राला अ‍ॅक्रेलिक रंगात रंगवा.
  • शक्य असल्यास चित्राच्या आजुबाजूचा रिकामा भागही कोणत्यातरी एका रंगाने रंगवा.
  • चित्र पूर्ण वाळले की त्यावर हलकासा वॉर्निशचा हात फिरवा.
  • आता हा सुंदर, रंगीत दगड पेपर वेट म्हणून वापरू शकता किंवा केवळ एक शोभिवंत वस्तू म्हणूनही टेबलवर ठेवू शकता.
  • गावी किंवा पर्यटनस्थळी गेल्यानंतर नदीपात्रातील गुळगुळीत दगड गोळा करून ठेवले असतील तर त्यावरही अशी चित्रे साकारून ते भेटवस्तू म्हणून प्रियजनांना देऊ शकता.

apac64kala@gmail.com