शरीराच्या इजा झालेल्या किंवा आजारी भागांस ते पूर्ववत होऊन कार्यक्षम होण्यासाठी उष्णता, विद्युत, जल आदी भौतिकीय साधनांचा उपयोग केला जातो. म्हणून या चिकित्सेला ‘भौतिकी चिकित्सा’ असे म्हणतात.

भौतिकी चिकित्सेसाठी नैसर्गिक साधनांचा उपयोग मानव अनादिकाळापासून करत आला आहे. विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी निरनिराळ्या प्रकारची स्नाने, नैसर्गिक खनिज जलाचे प्राशन आणि शारीरिक व्यायाम यांचा उपयोग करण्यात येत असे. ग्रीस, रोमन आणि भारतात पूर्वीपासून या चिकित्सेचा उपयोग केला जात असे. भौतिकी चिकित्सेला वैद्यकीय उपचारातील विशिष्ट स्थान आधुनिक काळात पहिल्या महायुद्धानंतर प्राप्त झाले. पोलिओच्या साथीतून बचावलेले अनेक अपंग व दुसऱ्या महायुद्धानंतर बचावलेले अपंग सैनिक यांच्यासाठी भौतिकी चिकित्सेचा वापर करण्यात आला. अस्थिभंग, भाजणे व पोळणे, अकस्मात उद्भवणारा पक्षाघात, क्षयरोग यांसारख्या विविध आजारांत भौतिक चिकित्सेचा वापर केला जातो. भौतिकी चिकित्सेसाठी जल, माती, प्रकाश, ध्वनी, विद्युत, उष्णता, मर्दन व व्यायाम, चुंबक, लेसर किरण आणि किरणोत्सर्ग या साधनांचा वापर केला जातो.

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…